नवऱ्यानं पैसे दिले नाही म्हणून महाभारतातल्या 'द्रोपदी'चा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, आता 'या' अवस्थेत?

Roopa Ganguly : 'महाभारत' या मालिकेने एक काळ गाजवला आहे. आजही प्रेक्षकांना या मालिकेची आणि कलाकारांची भुरळ पडते. मात्र द्रोपदी हे पात्र साकारलेल्या अभिनेत्री रुपा गांगुली यांची दयनीय अवस्था समोर आली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 3, 2023, 10:58 AM IST
नवऱ्यानं पैसे दिले नाही म्हणून महाभारतातल्या 'द्रोपदी'चा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, आता 'या' अवस्थेत? title=

बी आर चोप्राची हिट सिरियल 'महाभारत' मध्ये द्रोपदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपा गांगुली तुम्हाला लक्षात आहे का? रुपा गांगुली अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये पाहायला मिळाली. द्रोपदीची भूमिका साधारुन रुपा गांगुली यांनी अनेकांची मने जिंकली. मात्र याच अभिनेत्रीने अनेकदा आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. रुपा गांगुली यांच प्रोफेशनल लाईफ खूप छान सुरु होतं मात्र खासगी आयुष्यात मात्र अनेक संकटांना सामोरे जावे लागले. 

मेकॅनिकल इंजिनीअरसोबत लग्न, 14 वर्षांनंतर घटस्फोट 
रुपा गांगुली यांनी 1992 मध्ये ध्रुब मुखर्जीसोबत लग्न केलं. जो व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनीअर होते. लग्नाच्या 14 वर्षांनंतर यांच्या मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2009 मध्ये घटस्फोट घेतला. 

3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न 

रुपा गांगुलीने आपल्या नवऱ्यासाठी करिअर पणाला लावले. करिअर सोडून त्या पूर्णपणे घरीच रमल्या. तर नवऱ्यासोबत कोलकत्ता जाऊन स्थायिक होऊन हाऊसवाइफ बनल्या. रुपा गांगुलीने 2009 मध्ये धक्कादायक खुलासा केला की, नवरा खर्चासाठी पैसेही देत नसे. कंटाळून तीन वेळा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. 

पत्नीच्या लोकप्रियतेमुळे पती असुरक्षित 

रुपा गांगुली यांनी सांगितलं की, पती तिच्या स्टारडममुळे असुरक्षित असे. तिच्या पतीला पत्नी एक लोकप्रिय अभिनेत्री असणे स्वीकारणे कठीण झाले होते. लग्न टिकवण्यासाठी रुपा गांगुलीने खूप प्रयत्न केले. तिने सकाळी 9 च्या आधी आणि रात्री 10 नंतर कोणाच्याही कॉलला उत्तर दिले नाही. त्यांनी नेहमीच लग्नाला प्रथम प्राधान्य दिले. रूपा गांगुली म्हणाली होती, 'मी कितीही प्रयत्न केले तरी अपयशी ठरले. मी फरशी झाडली, भांडी केली, काय नाही केले? पण तरीही मला बाजूला ढकलले गेले.

महाभारताने दिली संधी 

रुपा गांगुलीने बंगाली टीव्ही सिरियलमध्ये डेब्यू केलं. त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये देखील काम केलं. हेच काम पाहून बी आर चोप्रा यांना 'महाभारत' मध्ये द्रोपदीची भूमिका मिळाली. रूपा गांगुली एका मुलाची आई असून ती अविवाहित जीवन जगत आहे. 2015 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश केला. 2016 मध्ये रूपा गांगुली यांना राज्यसभेसाठी नामांकन देण्यात आले होते.