Old Man Married For 37th Time In Front Of 28 Wives: ऐतिहासिक संदर्भ किंवा तत्सम पुस्तकं वाचताना अमुक एका राजाच्या 50 बायका, तमुक एकाच्या 12 बायका असं तुम्ही वाचलं, ऐकलं असेल. पण, असं कधी प्रत्यक्षात होताना तुम्ही पाहिलं आहे का?
विश्वास बसणार नाही, पण हे सर्व काही प्रत्यक्षातही घडलं आहे. कारण, जिथं बऱ्याच पुरुषांना एका लग्नातच भरुन पावल्यासारखं वाटतं तिथेच एका व्यक्तीने तब्बल 36 वेळा लग्न केल्यानंतर तो 37 व्या वेळीसुद्धा आनंदानं लग्नासाठी तयार झाला आहे.
सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ट्विटरवरील या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आणि त्याच्याभोवती बऱ्याच बायकांचा गराडा दिसत आहे.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार या वयोवृद्ध माणसानं 28 पत्नी, 135 मुलं आणि 126 नातवंडांच्या साक्षीनं 37 व्या वेळेस लग्न करताना दिसत आहे. ऐकणारे आणि वाचणारे हा आकडा पाहूनच चक्रावून जात आहेत.
आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विट करत हा व्हिडीओ सर्वांसमोर आणला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी या लग्नबंबाळ व्यक्तीला 'बहाद्दर' असंही म्हटलं आहे.
BRAVEST MAN..... LIVING
37th marriage in front of 28 wives, 135 children and 126 grandchildren.pic.twitter.com/DGyx4wBkHY
— Rupin Sharma (@rupin1992) June 6, 2021
बरं, हा व्हिडीओ आताला नाही. तर मागील वर्षी जून महिन्यातच तो कमाल व्हायल झाला होता. त्या क्षणापासून हा व्हिडीओ अनेकदा पाहिला गेला. जेव्हा केव्हा कोणाची खिल्ली उडवायची झाली तेव्हा-तेव्हा हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी शेअर केल्याचंही दिसून आलं.