मुंबई : नववधु प्रियंका चोप्रा आणि जोडीदार निक जोनस आता लग्नबंधनात अडकले आहे. 1 आणि 2 डिसेंबरमध्ये जोधपुरच्या उमेद भवनात हा सोहळा पार पडल्यानंतर दोघंही जोधपुर एअरपोर्टवर दिसले. हातावर मेंहदी, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर सिंदूर अशा नववधुच्या लूकमध्ये प्रियंका दिसली.
लग्नसोहळ्यानंतर हे नवी बॉलिवूडची जोडी अशी पद्धतीने चाहत्यांच्या समोर आहे. अगदी नववधुचा साज प्रियंकाला चांगलाच शोभून दिसत होता. हे दोघेही जोधपुरवरून मुंबईला रवाना झाले आहेत.
#WATCH: Priyanka Chopra and Nick Jonas leave from Jodhpur. The couple tied knot in a two-day event at Jodhpur's Umaid Bhawan Palace on December 1-2. #Rajasthan pic.twitter.com/wrktESuz1e
— ANI (@ANI) December 3, 2018
प्रियंकाने हिरव्या रंगाची सब्यसाचीची साडी नेसली होती ज्यावर गोल्डन रंगाची एम्ब्रोडरी होती. यावेळी तिचा लूक अतिशय नववधुप्रमाणे होता. प्रियंकाने हातात लग्नाचा चुडा, कपाळी सिंदूर आणि मंगळसुत्र घातलं होतं. त्याप्रमाणेच गळ्यात एक नेकपिस देखील होता. यामध्ये ती अगदी इंडियन ब्राइडच्या लूकमध्ये होते.
Rajasthan: Priyanka Chopra and Nick Jonas leave from Jodhpur. The couple tied knot in a two-day event at Jodhpur's Umaid Bhawan Palace on December 1-2. pic.twitter.com/OT9nng4VcX
— ANI (@ANI) December 3, 2018
तर निक जोनसने सफेद रंगाचं शर्ट त्यावर ब्राऊन जॅकेट आणि त्याच रंगाची पँट घातली होती. यावेळी निक सफेद रंगाच्या स्निकरमध्ये दिसला. निकची संपूर्ण टीम त्याच्यासोबत होती.