मुंबई : अभिनेता मनोज बाजपेयीचं नाव इंडस्ट्रीमधील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये आहे. आजकाल अभिनेत्याचा 'डायल 100' चर्चेत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट केवळ 6 ऑगस्ट रोजी रिलीज झाला. ज्यामध्ये तो एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. मात्र, याआधीही अभिनेत्याने 3-4 वेळा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. 'डायल 100'मध्ये मनोज बाजपेयीसोबत साक्षी तंवरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. दरम्यान, मनोज बाजपेयी आणि त्यांची 'डायल 100' मधील सह-अभिनेत्रीला साक्षी तंवरला ते दिवस आठवले जेव्हा साक्षीचा अभिनय शिक्षक होता. तेव्हा साक्षी नवी दिल्लीत महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती.
एका मुलाखतीत बोलत असताना, साक्षी तंवरने ते दिवसातील आठवणींना उजाळा देत सांगितलं की, एकदा तिला मनोज बाजपेयीच्या रागाला कशाप्रकारे बळी पडावं लागलं होतं. साक्षी तंवर बद्दल बोलताना, मनोज म्हणाला की, 'मला आठवतंय जेव्हा मी तिला सांगितलं होतं की, तुम्ही ते गांभीर्याने घ्या. कारण तुम्ही अभिनयामध्ये खूप चांगल्या आहात. आणि आज तिचा मला खूप अभिमान वाटतो. ती गेल्यानंतर आम्ही कधीही फोनवर बोललो नाही. पण, आज तिने स्वतः निर्माण केलेल्या गोष्टींचा मला खूप अभिमान वाटतो. तिला मुख्य भूमिका देण्याचा माझा निर्णय तिने सिद्ध केला आहे.
मनोज बाजपेयी मुलींच्या महाविद्यालयात गेल्यावर एका विचित्र परिस्थितीबद्दल म्हणाला. 'मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू. मला एलएसआर महाविद्यालयात जाणं खूप विचित्र वाटलं. कारण ते मुलींचे कॉलेज आहे आणि मी खूप लाजाळू व्यक्ती आहे. मला मुलींसमोर खूप लाज वाटते. म्हणून मी काही मुलींना गेटवर माझी वाट पाहण्यास सांगितलं.
'तिथे मला कुणी दिसलं नाही, म्हणून मी ढाब्यावर गेलो आणि तिथे माझा वेळ वाया घालवू लागलो. एकेदिवशी, मी चुकून महिला वॉशरूममध्ये प्रवेश केला. आणि मी तिथे असताना काही मुली आत आल्या आणि मी तिथून बाहेर पडू शकलो नाही. मुली बाहेर जाईपर्यंत मी तिथेच लपून बसलो. या वर्षी, तो प्रथम ZEE5च्या 'सायलेन्स' मध्ये दिसला. यानंतर, 'द फॅमिली मॅन सीझन 2', 'रे' सिनेमा मध्येही दिसला. आता तो 'डायल 100'मुळे हेडलाईन्स मध्ये आहे.