कौटुंबिक कलह आणि घटस्फोटावर अखेर Siddhartha Jadhav चं वक्तव्य; संतापत म्हणाला...

यांच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी बिनसल्याच्या बऱ्याच चर्चांनी सध्या जोर धरला आहे

Updated: Jun 23, 2022, 12:16 PM IST
कौटुंबिक कलह आणि घटस्फोटावर अखेर Siddhartha Jadhav चं वक्तव्य; संतापत म्हणाला...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका गाजवणारा आणि हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव गेल्या काही दिवसांपासून भलत्याच कारणानं चर्चेत आला आहे. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी बिनसल्याच्या बऱ्याच चर्चांनी सध्या जोर धरला आहे. (Marathi Actor Siddharth Jadhav reacts on rumors of disputes with wife divorce)

मुद्दा इतरा गंभीर आहे, की या चर्चा थेट घटस्फोटापर्यंतही गेल्या आहेत. आपल्या खासगी आयुष्याविषयी होणाऱ्या या सर्व चर्चा पाहता अखेर सिद्धार्थनं मौन सोडलं आहे. 

अतिशय संतप्त स्वरात त्यानं एका माध्यमाशी संवाद साधताना यासंदर्भातील प्रतिक्रिया दिली, सुरुवातीला या गोष्टींवर बोलण्यास नकार देणारा सिद्धार्थ पुढे म्हणाला, 'ही माहिती, या बातम्या कुठून येत आहेत? यांचे सूत्र कोण हेसुद्धा माहित नाही'. 

पत्नीसोबतच्या नात्यात आलेल्या दुराव्याबाबत सांगताना आपल्या नात्यात सर्वकाही सुरळीत असल्याचं तो म्हणाला. गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि त्याच्या पत्नीच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. पण, प्रत्यक्षात मात्र नात्यात कोणताही तणाव नसल्याचं म्हणत सिद्धार्थनं या सर्व अफवा उधळून लावल्या. 

तृप्तीनं हटवलं जाधव आडनाव? 
सिद्धार्थ इथे पत्नीसोबतच्या नात्यात तणाव नसल्याचं म्हणत असला तरीही तिथे तृप्तीनं मात्र तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून 'जाधव' आडनाव हटवलं आहे. सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर Trupti V Akkalwar असं नाव दिसत आहे. इतकंच नव्हे, तर गेल्या दोन वर्षांपासून तिनं सिद्धार्थसोबतचा एकही फोटो पोस्ट केला नसल्याचं म्हटलं जात आहे. 

तृप्तीच्या या कृती काहीतरही वेगळंच सांगत आहेत. तेव्हा नेमकं सत्य काय हाच प्रश्न आता चाहत्यांनाही पडत आहे.