नर्गिस फाखरीचा बिकीनी व्हिडिओ व्हायरल....

अभिनेत्री नर्सिग फाखरी सध्या वेनिसमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. 

Updated: Jun 28, 2018, 10:51 AM IST
नर्गिस फाखरीचा बिकीनी व्हिडिओ व्हायरल.... title=

मुंबई : रॉकस्टारसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री नर्सिग फाखरी सध्या वेनिसमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. ती एकटी नाही तर तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड देखील आहे. दोघांचा मस्तीभरा अंदाज सोशल मीडियावर पाहायला मिळतो. नर्गिस फाखरी आणि उद्य चोप्राच्या नात्याची जोरदार चर्चा होती. पण आता नर्गिस आयुष्यात पुढे निघून गेली आहे, असे तिच्या इंस्‍टाग्राम पोस्टवरुन वाटते. अलिकडेच नर्सिसने तिचा एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात ती ब्लॅक बिकीनीमध्ये दिसत आहे. बॉयफ्रेंडने छान पोज देण्यास सांगितल्यावर तिचा मजेशीर अंदाज या व्हिडिओत पाहायला मिळतो.

नर्गिस फाखरी सध्या अमेरिकन फिल्ममेकर आणि व्हिडिओ एडिटर मॅट अलोनजोला डेट करत आहे. आणि त्याच्यासोबतच वेनिसमध्ये सुट्ट्या एज्नॉय करत आहे. याचे फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोत ती स्वतःला ज्युलियट आणि मॅटला रोमियो म्हणत आहे. तुम्हीही पहा हा व्हिडिओ....

 

When he ask you to pose in mid convo  @mattalonzo

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri) on

बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करणारी नर्गिस....

 

Life is better when you’re laughing. He makes me laugh @mattalonzo

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri) on

 

King & Queen 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri) on

 

#sunset  @mattalonzo

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri) on

नर्गिस आणि उदय चोप्रा हे फार काळ रिलेशनशीपमध्ये होते. पण गेल्या वर्षी ख्रिसमसनंतर दोघेही वेगळे झाल्याची चर्चा होती. 

२०१६ मध्ये आलेल्या बेंजो सिनेमात नर्गिस झळकली होती. पण उदय चोप्रापासून वेगळे झाल्यानंतर नर्गिस सिनेमाचे प्रमोशन न करताच देशाबाहेर गेली. लवकरच ती राजकुमार रावच्या '5 वेडिंग्‍स' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. याशिवाय संजय दत्तसोबत टोरबाज सिनेमातही झळकेल.