आहारतज्ञ ऋजुता दिवेकरनं तैमुरला दिलं वाढदिवसाचं 'हटके गिफ्ट'

'टशन' चित्रपटातील करिना कपूरची 'झिरो साईज फिगर' असो किंवा गरोदरपणानंतर पुन्हा सुडौल बांध्यातील करिना कपूर असो.

Updated: Dec 20, 2017, 07:38 PM IST
आहारतज्ञ ऋजुता दिवेकरनं तैमुरला दिलं वाढदिवसाचं 'हटके गिफ्ट'  title=

मुंबई : 'टशन' चित्रपटातील करिना कपूरची 'झिरो साईज फिगर' असो किंवा गरोदरपणानंतर पुन्हा सुडौल बांध्यातील करिना कपूर असो.

बेबोच्या फिगरमागे प्रसिद्ध सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरचा फीटनेस फंडा महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. 

डाएटशी निगडीत अनेक भ्रामक समजुती ऋजुताने बदलल्या. करिनाच्या माध्यमातून ऋजुता अनेक फीटनेस फ्रीक लोकांपर्यंत पोहचली.  आज ऋजुताने तैमुरला पहिल्या वाढदिवसादिवशी शुभेच्छा देताना खास गिफ्ट दिलं आहे.  

तैमुरचा पहिला वाढदिवस 

तैमुर आज सेलिब्रिटींच्या उपस्थितीमध्ये पतौडी पॅलेसमध्ये पहिला वाढदिवस साजरा करत आहे. लहान मुलांचा वाढदिवस म्हणजे खेळणी, कपडे अशी गिफ्ट्स दिली जातात. पण ऋजुताने तैमुरला खास आणि चिरंतन राहील असे इकोफ्रेंडली गिफ्ट दिले आहे.  

 

 

ऋजुताचे गिफ्ट   

ऋजुता दिवेकरने तैमुरसाठी सुपरफुड्सचं फॉरेस्ट गिफ्ट केलं आहे. यामध्ये ३ जांभूळ, १ फणस, १ आवळा, ४० केळी, १४ शेवग्याची, १ कोकम, १ पपई, ५ सीताफळ,  २ रामफळ, २ लिंबूंची झाडं लावली आहेत. 

सोबतच काही लोकल धान्यं, मिरची, कढीपत्ता, झेंडू, हळद, आलं अशी विविध झाडं लावली आहे. सुमारे १००० स्क्वेअर फीट्सच्या जागेवर १०० विविध झाडं लावण्यात आली आहेत. 

तैमुरच्या वयाची झाडं

तैमुरसाठी बनवण्यात आलेल्या या खास जंगलाला त्याचेच नाव देण्यात आले आहे. यामधील अनेक झाडं ही तैमुरच्या वयापेक्षाही लहान आहेत.