पंकज त्रिपाठी यांचा मुलगा पाहू शकत नाही 'ओएमजी 2', कारण सांगत म्हणाला...

Pankaj Tripathi's Reel Son : पंकज त्रिपाठी यांच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराला पाहता येणार नाही त्याचाच पहिला चित्रपट... कारण सांगत वाईट वाटत असल्याचं सांगत म्हणाला...

दिक्षा पाटील | Updated: Aug 19, 2023, 12:24 PM IST
पंकज त्रिपाठी यांचा मुलगा पाहू शकत नाही 'ओएमजी 2', कारण सांगत म्हणाला... title=
(Photo Credit : Social Media)

Aarush Varma on OMG 2 : एकीकडे 'गदर 2' ची सगळीकडे चर्चा सुरु असताना दुसरीकडे अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2' ला देखील प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. पण त्यातही जेव्हा या चित्रपटाला 'ए' सर्टिफिकेट देण्यात आलं, तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेकांना हा चित्रपट पाहायला मिळत नाही आहे. 'ओएमजी 2' चे दिग्दर्शक अमिता रायपासून अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांनी चित्रपटाला मिळालेल्या 'ए' सर्टिफिकेटवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाला 'ए' सर्टिफिकेट मिळाल्यामुळे चित्रपटात पंकज त्रिपाठी यांच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आरुष वर्माला हा चित्रपट पाहता येत नाही आहे. त्यातही आरुष वर्माचा पहिलाच चित्रपट होता. 

आरुष वर्मानं 'ओएमजी 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आरुष वर्मा हा आता 16 वर्षांचा आहे. चित्रपटाला 'ए' सर्टिफिकेट मिळाल्यामुळे त्याला त्याचा पहिला चित्रपट पाहता येत नाही आहे. इंडियाटुडेला दिलेल्या मुलाखतीत याविषयी बोलताना आरुष म्हणाला, त्याला खूप वाईट वाटत आहे, कारण त्याचा हा पहिला चित्रपट होता. त्याला इच्छा होती की त्याला त्याच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायचा होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आरुष म्हणाला, हा माझा पहिला चित्रपट होता. माझं कुटुंब, मित्र आणि माझ्या ओळखीत असलेले सगळेच या चित्रपटासाठी उत्सुक होते. पण ते आता हा चित्रपट पाहू शकत नाही. जर कोणी चित्रपट पाहिला तरी त्यांना कळंत की या चित्रपटातून सेक्स एज्युकेशनविषयी जागरुक करणं हाच मुद्दा आहे. अशा काही विषयांवर या चित्रपटात बोलण्यात आलं आहे, जे लहाणवयात मुलांना शिकवणं खूप महत्त्वाचं आहे.

हेही वाचा : 'गदर 2' सुरु असतानाच बॉम्बस्फोट! समोर आलं धक्कादायक कारण

दरम्यान, चित्रपटाला सेंसर बोर्डानं 'ए' सर्टिफिकेट दिल्यानं आता फक्त 18 वर्षे किंवा त्यापेक्षा वयानं मोठं असलेल्या व्यक्तीच फक्त हा चित्रपट पाहू शकतात. हा चित्रपट सेक्स एज्युकेशन या विषयावर आधारीत आहे आणि त्यात सनातन धर्माच्या अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यातून मुलांना अनेक गोष्टींविषयी कळलं असतं, पण आता चित्रपटाला  'ए' सर्टिफिकेट दिल्यानं ज्या कारणामुळे चित्रपट बनवला आहे तो सगळ्यापर्यंत पोहचू शकत नाही. याविषयी पुढे बोलताना आरुष म्हणाला, 'जर ते या चित्रपटाला 18 वर्षांपेक्षा मोठे असणारे लोक बघू शकतात असं म्हणत आहेत, तर याचा अर्थ चित्रपट ज्या कारणासाठी बनवला ते सगळं व्यर्थ झालं आहे. माझी खूप इच्छा होती की मी स्वत:ला मोठ्या पडद्यावर अभिनय करताना पाहू. पण असं झालं नाही, कारण त्यांनी या चित्रपटाला  'ए' सर्टिफिकेट दिलं आहे. मला खूप वाईट वाटतं आहे.'