वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ मालिका होणार पुन्हा सुरू, हा असेल बदल

कथानकामुळे काही दिवसातच वादग्रस्त ठरलेली आणि बंद करण्यात आलेली मालिका ‘पहरेदार पिया की’ लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. बॉलिवूड लाईफ डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, या मालिकेत आता लीप दाखवला जाईल.

Updated: Sep 25, 2017, 01:47 PM IST
वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ मालिका होणार पुन्हा सुरू, हा असेल बदल title=

मुंबई : कथानकामुळे काही दिवसातच वादग्रस्त ठरलेली आणि बंद करण्यात आलेली मालिका ‘पहरेदार पिया की’ लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. बॉलिवूड लाईफ डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, या मालिकेत आता लीप दाखवला जाईल.

अभिनेता शंतनू महेश्वरी आणि अभिनेती तेजस्वी प्रकाश यांच्यात रोमान्स दाखवला जाईल. शंतनू हा राजकुमार रतनच्या भूमिकेत दिसेल.

शंतनू हा पहिल्यांदाच अशा फॅमिली ड्रामामध्ये बघायला मिळणार आहे. याआधी त्याने डान्स बेस्ड टिव्ही शोमध्ये काम केलं होतं. त्यासोबतच तो खतरों के खिलाडीमध्येही दिसला. शंतनू आणि तेजस्वी एकाच वयाचे आहेत. पण मालिकेत तो तेजस्वीच्या भावी पतीच्या रूपात दिसेल. लवकरच या मालिकेची शुटिंग सुरू होणार आहे. 

शंतनू आणि तेजस्वी या मालिकेच्या शुटिंगसाठी लवकरच बिकानेरला जाणार आहेत. या मालिकेतील राजकुमार रतन हा शिक्षणासाठी परदेशात गेल्याचे दाखवले जाणार आहे. आणि शिक्षण पूर्ण करून आल्यावर तो पत्नी आणि परिवाराला भेटतो. आता या मालिकेत अनेक बदल करण्यात आले आहेत.