प्राजक्ता माळीचं चॅलेंज, सई ताम्हणकरची बोबडी वळली; पाहा Viral Video

सई ताम्हणकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 18, 2022, 06:08 PM IST
प्राजक्ता माळीचं चॅलेंज, सई ताम्हणकरची बोबडी वळली; पाहा Viral Video title=

मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच सईनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. दरम्यान, या व्हिडीओचा संबंध हा अभिनेत्री प्राजक्ता माळीशी आहे. 

आणखी वाचा : ज्या कार्यक्रमातून अनेक कोट्यधीश होतात, त्याच 'कौन बनेगा करोडपती' साठी अमिताभ बच्चन किती मानधन घेतात माहितीये का? आकडा जाणून उडून जाल

सईचा हा व्हिडीओ सोनी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत सई प्राजक्ता माळीनं दिलेल्या चॅलेंजबद्दल बोलताना दिसते. खरंतर, सई आणि प्राजक्ता 15 ऑगस्टपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं नवीन पर्व सुरु झालं आहे. या नवीन पर्वाच्या निमित्तानं प्राजक्तानं सईला एक चॅलेंज दिलं आहे. 

आणखी वाचा : किंग कोब्राचा मुलाला दंश, त्या नंतर जे घडलं, त्याचा कोणी विचार देखील करू शकत नाही; पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, व्हिडीओच्या सुरुवातीला सई म्हणते की, प्राजूनं मला tounge twister चं चॅलेन्जज दिलं आहे. मी प्रयत्न करणार आहे… प्राजू तू मला चॅलेंज दिलं आहे त्याची सुरुवात मी हर्रर्रर्रर्र…. अशी करणार आहे. यानंतर सई एक जिभेची बोबडी वळवणारा शब्द दोन ते तीन वेळा बोलते आणि त्यानंतर सई बोलते, प्राजू मी जिंकले आणि तिला चिडवून दाखवते.' तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  

आणखी वाचा : कोणते दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट ठरले? R. Madhavan च्या वक्तव्यानं पेटू शकतो नवा वाद

सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम घराघरात पोहोचला प्रसिद्ध आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा- चार वार हास्याचा चौकार!' असे या नव्या पर्वाचे नाव आहे. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे.