'पीसी आणि तिच्या लेकीला....', प्रियांका मुलीसोबत फोटो शेअर करताच अस का म्हणाली Kareena Kapoor?

 प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra)सरोगसीद्वारे जानेवारी महिन्यात गोंडस मुलीला जन्म दिला.  

Updated: Aug 22, 2022, 01:34 PM IST
'पीसी आणि तिच्या लेकीला....', प्रियांका मुलीसोबत फोटो शेअर करताच अस का म्हणाली Kareena Kapoor?

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra)सरोगसीद्वारे जानेवारी महिन्यात गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र बाळ प्रीमॅच्युअर असल्याने बाळावर हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू होते. अखेर 100 दिवसानंतर प्रियांकाची मुलगी घरी परतली. लेक घरी परतल्यानंतर प्रियंका कायम लेकीसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील प्रियंकाने लेकीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये पीसी मुलीसोबत आनंदी वेळ व्यतीत करताना दिसत आहे. प्रियंका कायम मुलगी मालती मेरीसोबत (Malti Marie) फोटो पोस्ट करत असते, पण तिने अद्याप मुलीचा चेहरा दाखलेला नाही. 

आता पोस्ट केलेल्या फोटोमध्ये देखील प्रियंका मुलीसोबत आनंदी दिसत आहे. मुलीसोबत फोटो पोस्ट करत प्रियंकाने कॅप्शनमध्ये 'प्रेमासारखं दुसरं काहीच नाही...' असं लिहिलं आहे. सध्या प्रियंकाचे लेकीसोबत फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रियंकाच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर फक्त चाहत्यांनीच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील कमेंटचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री करीना कपूर खानने (Kareena Kapoor) प्रियंका आणि लेकीच्या फोटोवर 'पीसी आणि तिच्या लेकीला मोठा हग...' अशी कमेंट केली आहे. 

फक्त करीनानेच नाही तर, प्रियंकाची बहिण आणि अभिनेत्री परिणीती चोप्राने देखील फोटोवर 'मला तिची आठवण येत आहे...' अशी कमेंट करत भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रियंका आणि मालती मेरीच्या फोटोंची चर्चा रंगत आहेत. 

प्रियंका आणि मालती मेरीच्या फोटोवर करीना आणि परिणीती यांच्या शिवाय अनुष्का शर्मा, प्रीति झिंटा आणि दीया मिर्जा यांनी देखील कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे.