मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी म्हणून कुटुंब आणि चाहते प्रार्थना करत आहेत. रोज त्यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. आता देखील त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. नुकताच राजू श्रीवास्तव यांचा पुतण्या मयंक श्रीवास्तव यानेही त्यांच्या तब्येतीची माहिती देत राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून. राजू आता डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देत आहे.
कुटुंबातील सदस्य कुशल श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांची संपूर्ण टीम राजू यांच्यावर योग्य उपचार करत आहे. पण अद्यापही त्यांनी व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलेलं नाही. राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी, व्हेंटिलेटरवरून काढण्याचा निर्णय अद्याप घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राजू श्रीवास्तव यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या हात-पायांची हालचाल देखील सुरू झाली. मात्र कोमात गेल्याने त्यांनी काही सेकंदांसाठीच अशी प्रतिक्रिया दिली. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. राजू यांच्या दिर्घायुष्यासाठी चाहते आणि कुटुंब प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टला वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी राजू श्रीवास्तव सकाळी जिममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक बेशुद्ध होऊन ते जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली होती. मात्र, त्यांना अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.