सोशल मीडियावर ALIA BHATTच्या गाण्याचीच चर्चा..प्रेग्नन्सीमध्ये गायली आणि..

सिनेमा रिलीझ व्हायला अवघे 2आठवडे राहिलेत .नुकतेच आलिया आणि रणबीर या दोघांनी IIT बॉम्बे मध्ये हजेरी लावली

Updated: Aug 28, 2022, 09:17 AM IST
सोशल मीडियावर ALIA BHATTच्या गाण्याचीच चर्चा..प्रेग्नन्सीमध्ये गायली  आणि..  title=

ALIA BHATT SUNG SONG DURING PREGNANCY: आलिया भट्ट आणि  रणबीर कपूर यांचा  'ब्रह्मास्त्र' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय या सिनेमाचं प्रमोशन सध्या जोरात सुरु आहे आली या  आणि रणबीर दोघेही प्रमोशनमध्ये खूप बिझी आहेत. सिनेमा रिलीझ व्हायला अवघे 2आठवडे राहिलेत .नुकतेच आलिया आणि रणबीर या दोघांनी IIT बॉम्बे मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात आलियाने सिनेमातील 'केसरीया' हे रोमँटिक गाणं स्वतःच्या आवाजात गायलं सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रणबीरसुद्धा या व्हिडिओमध्ये दिसतोय ज्यात गाणं गाणाऱ्या आलियाला तो सपोर्ट करताना दिसत आहे सोशल मीडियावर आलियाच्या या गाण्याची आणि लूकची सध्या चर्चाच चर्चा आहे यात आलियाने ब्राऊन रंगाचा शर्ट आणि बेल बॉटम पॅन्ट  घातलीय ज्यात ती कमालीची सुंदर दिसतेय.  

आलियाने इन्स्टाग्रामवर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताचं फक्त चाहत्यांनीचं नाही, तर अनेक सेलिब्रिटींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या. सध्या आलिया-रणबीरच्या येणाऱ्या बाळाची चर्चा तुफान रंगत आहे.