मुंबई : 'सपने देखो, सपने पूरे होते ही हैं...' काहींसाठी हे वाक्य फक्त बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आहे. परंतू सिगिंग सेन्सेशन ठरलेल्या रानू मंडल यांच्या सोबत चक्क असं घडलं आहे. दहा वर्ष आपल्या कुटुंबापासून दूर, कोणाची साथ नाही, कोणाचा सहारा नाही. तरी देखील आपला छंद जोपासणाऱ्या रानू यांच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहे. अशात गायक हिमेश रेशमिया त्यांचा गॉडफादर ठरला आहे.
हिमेश पुन्हा त्यांना गाण्यासाठी संधी दिली आहे. हिमेशच्या सुप्रसिद्ध गाण्याला त्या आवाज देणार आहेत. हिमेशच्या 'हॅपी हार्डी अॅंड हिर' चित्रपटाच्या दोन गाण्यांना रानू यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात येणार आहे. त्यांचा आणखी एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
१२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या '३६ चायना टाउन' चित्रपटातील 'आ आ आशिकी' गाण्याला आवाज देणार आहे. रानूने याआधी हिमेश सोबत 'तेरी मेरी कहानी' या गाण्याला आवाज दिला होता.
२००६ मध्ये आलेल्या '३६ चायना टाउन' चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास-मस्तान यांनी केले होते. त्याचप्रमाणे या चित्रपटात अभिनेत्री करिना कपूर, अभिनेता शाहिद कपूर, उपेन पटेल, अक्षय खन्ना आणि परेश रावल यांनी भूमिका साकारल्या होत्या.