रणवीरच्या 'रेड डेविल' लूकला घाबरली 'ही' चिमुरडी

रणवीर लवकरच '८३' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

Updated: Oct 3, 2019, 04:57 PM IST
रणवीरच्या 'रेड डेविल' लूकला घाबरली 'ही' चिमुरडी title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमी त्याच्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. त्याच्या विचित्र कपड्यांमुळे सोशल मीडियावरही नेटकरी त्याला कायम ट्रोल करत असतात. आता तर रणवीरचा विचित्र रूप पाहून एक चिमूरडी चक्क रडायला लागली. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे तो पुन्हा ट्रोल होताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Lil kiddo got scared of i Baba

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

मंगळवारी रात्री एका डबिंग स्टुडिओ बाहेर रणवीर स्पॉट झाला. यावेळेस त्याने लाल रंगाचे कपडे घातले होते. तेव्हा त्याठिकाणी त्याच्या चाहत्यांनी त्याला घरले. चाहत्यांच्या घोळक्यात असलेली एक चिमुरडी मात्र त्याला पाहून रडायला लागली. 

रणवीर लवकरच '८३' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. '८३' चित्रपट वर्ल्ड कप १९८३ वर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. रणवीर या भूमिकेसाठी अतिशय मेहनत करत आहे.

या चित्रपटात रणवीरच नव्हे, तर अभिनेत्री दीपिका पदुकोणही या चित्रपटातून झळकणार आहे. ती लग्नानंतर पहिल्यांदाच रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत दिसेल. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा दीपिका साकारणार आहे.