सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

महाभारत या प्रसिद्घ मालिकेतील अभिनेत्याचे निधन, पाहा कोण आहे हा अभिनेता 

Updated: Jul 30, 2022, 09:37 AM IST
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन  title=

मुंबई : सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाल्याची घटना घडली आहे. वयाच्या 65 व्या त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते रसिक दवे यांचे शुक्रवारी रात्री ८ वाजता निधन झाल्याची घटना घडली. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते जवळजवळ दोन वर्षे डायलिसिसवर होते आणि त्यांना आठवड्यातून तीनदा रुग्णालयात जावे लागत होते. तसेच त्यांची किडनी निकामी झाली होती. गेल्या 15 दिवस ते रुग्णालयात दाखल होते. मात्र उपचारा दरम्यानच त्यांचे निधन झाले.  

रसिक दवे हे अभिनेत्री केतकी दवे यांचे पती होते. दवे हे 'महाभारत'मधील 'नंदा' या व्यक्तिरेखेसाठी ओळखले जात होते. तसेच अनेक गुजराती नाटके, गुजराती चित्रपट आणि अनेक मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे.  संस्कार धरोहर अपना की, सीआयडी, कृष्णा यांसारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा ते भाग होते. केतकी आणि रसिक रिअॅलिटी शो नच बलिये मध्ये ते देखील दिसले होते.

दरम्यान रसिक दवेच्या निधनानंतर आता सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. तर सिनेसृष्टीतून आता अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहतायत.