राजकारणातील एन्ट्री विषयी रितेशचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख 'हाऊसफुल ४' चित्रपटामुळे प्रकाशझोतात आला आहे.

Updated: Nov 11, 2019, 07:50 PM IST
राजकारणातील एन्ट्री विषयी रितेशचा मोठा खुलासा  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख 'हाऊसफुल ४' चित्रपटामुळे प्रकाशझोतात आला आहे. चित्रपट चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर रितेश सतत चर्चेत आहे. रितेश हा राजकारणी घरण्यामधून असल्यामुळे राजकारणात चालू असलेल्या घडामोडींबद्दल विचारणा करण्यात येत आहे. 

रितेश देशमुखचे भाऊ अमीत देशमुख आणि धिरज देशमुख राजकाणात सक्रिय आहेत. शिवाय दोघेही आमदार आहेत. त्यामुळे तू पुढे राजकारणात सक्रिय होणार का? असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला. 

या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला, 'मी माझे निर्णय स्वत: घेतो. मी एक अभिनेता आहे आणि राजकारण मी माझ्या भावांच्या नावावर केलं आहे. मी प्रत्येकाच्या भावनांचा सन्मान करतो.' असं वक्तव्य रितेशने केलं आहे. 

'हाऊसफुल ४' चित्रपटानंतर रितेश 'मरजावां' चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील झळकणार आहे. चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे.