मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांची बहिण आणि अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिची सासू ऋतू नंदा यांच आज निधन झालं. ऋतू नंदा यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूरने याबाबतची अधिकृत माहिती आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरून दिली आहे.
रिद्धिमा पोस्ट शेअर करताना म्हणते की,'सगळ्यात दयाळू आणि सज्जन लोकांना मी भेटली आहे. तुमच्या आत्माला शांती लाभो.'
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये श्वेता बच्चनचे सासरे रंजन नंदा यांच निधन झालं होतं. आणि आज ऋतू नंदा यांच निधन झालं आहे. श्वेता बच्चन आणि तिच्या कुटुंबियांवरून मोठ्या व्यक्तीला हात निघून गेला आहे.
ऋषी कपूर यांची बहिण ऋतू नंदा ही रंजन नंदा यांची पत्नी होती. श्वेता बच्चनचं लग्न त्यांच्या मुलाशी निखिल नंदासोबत झालं होतं. ते लोकप्रिय इंजिनिअर कंपनीत चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत. ऋतू नंदा या स्वतः एंट्रप्रेनर असून एका लाइफ इन्युशरन्स बिझनेसशी जोडलेल्या आहेत.
Ritu Nanda, daughter of late actor and director Raj Kapoor and mother-in-law of Shweta Bachchan passed away today. (Pic courtesy: Riddhima Kapoor Sahni's Instagram page) pic.twitter.com/h4ouvhL6fw
— ANI (@ANI) January 14, 2020
रणधीर कपूरने दिलेल्या माहितीनुसार, ऋतू नंदा या कॅन्सरशी झुंजत होत्या. 2013 सालापासू त्यांच्यावर कॅन्सरसंबंधीत उपचार सुरू होते. त्यांच्यावरील अंत्यविधी या दिल्लीत होणार आहे.