.. म्हणून बिग बॉसमध्ये सलमान खानने मागितली कुत्र्यांंची माफी

बिग बॉस हा नेहमीच वादामध्ये अडकलेला आणि लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे.

Updated: Oct 15, 2017, 12:19 PM IST
.. म्हणून बिग बॉसमध्ये सलमान खानने मागितली कुत्र्यांंची माफी

मुंबई : बिग बॉस हा नेहमीच वादामध्ये अडकलेला आणि लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे.

काही दिवसांपूर्वी बिग बॉसचा अकरावा सीझन सुरू झाला आणि पहिल्याच आठवड्यापासून या शोसोबत वादही सुरू झाले आहेत. 

आठवडाभर 'बिग बॉस'मधील स्पर्धक वेगवेगळे खेळ खेळतात. विकेंडला मात्र त्यांच्या परफॉर्मन्सनुसार आणि लोकांच्या मतानुसार स्पर्धकाला शोमधून बाहेर काढले जाते. त्यामुळे सलमान खानच्या खुमासदार शैलीतील स्पर्धकांसोबतची धमालमस्ती आणि प्रसंगी स्पर्धकांची 'हजेरी' घेणं पाहणं अनेकजण चुकवत नाहीत.  

पहिल्याच आठवड्यात झुबैर खानच्या बेशिस्त वगण्यावरून आणि बोलण्यावरून सलमान खानने त्याला खडे बोल सुनावले होते. मात्र यानंतर जुबैरने झोपेच्या घेतल्याने त्याची तात्काळ हाकलपट्टी करण्यात आली होती. 

गेल्या आठवड्यातील बिग बॉसच्या घरातील प्रकार पाहता याची तुलना कुत्र्यांशी करण्यात आली होती. मग सलमान खानने कोणाचेही नाव घेता या प्रकारामुळे कुत्र्यांची बदनामी झाल्याने थेट त्यांचीच माफी मागितली आहे.