मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सध्या सलमान 'बिग बॉस' (Bigg Boss) या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. 'बिग बॉस' चा 16 (Bigg Boss 16) वा सीझनची प्रेक्षक प्रतिक्षा करत आहेत. या शोचे सुत्रसंचालन सलमान करतो. सलमाननं 15 व्या सीझनपेक्षा तिप्पट जास्त मानधन 16 सीझनसाठी घेणार असल्याचे म्हटले आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
रिपोर्टनुसार, सलमान या सीझनसाठी जवळपास 1 हजार कोटी रुपये मानधन म्हणून घेणार आहे. ही बातमी ऐकल्यानंतर सलमान यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या 'केजीएफ: चॅप्टर 2' च्या बजेट पेक्षा 10 पट जास्त मानधन घेणार आहे.
यश स्टारर हा चित्रपट सुमारे 100 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास 1000 कोटींची कमाई केली. याचा अर्थ, सलमान यंदाच्या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या बजेटपेक्षा 10 पट मानधन घेत आहे.
'बिग बॉस 16' ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या सीझनच्या सेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी बिग बॉसच्या घरात निळ्या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. शोच्या स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर, निर्माते मोहित मलिक, नकुल मेहता, राज अनादकट, दिव्यांका त्रिपाठी, शिवांगी जोशी, टीना दत्ता, पूनम पांडे आणि बसीर अली दिसू शकतात. या सर्व अभिनेत्यांशिवाय अर्जुन बिजलानीलाही या शोची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्याने ती नाकारली.