KKBKKJ Box Office Collection Day 1 : सलमानच्या चित्रपटानं पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 1 : 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटानं पहिल्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच ही बातमी वाचा... दरम्यान, हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी मीम्स शेअर केले आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 22, 2023, 10:52 AM IST
KKBKKJ Box Office Collection Day 1 : सलमानच्या चित्रपटानं पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई title=
(Photo Credit : Social Media)

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 1 : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट काल 21 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. ईदच्या निमित्तानं हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून सलमाननं खूप मोठ्या काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. पण चित्रपटाला पाहिजे तितका रिस्पॉन्स मिळाला नाही. चित्रपटानं पहिल्याच दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊया.

सलमानच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 12 कोटींची कमाई केली आहे. तर बॉक्स ऑफिस वर्ल्ड वाईडनं दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल चेन्समध्ये चित्रपटानं फक्त 5.35 कोटींचं कलेक्शन केलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असताना सलमानच्या चित्रपटानं इतकी कमाई केली, याचा अनेकांना आश्चर्य झालं आहे. इतकं असताना चित्रपटाला क्रिटिक्स आणि प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यांच लक्ष यामुळे वेधलं आहे की हा चित्रपट जगभरात 5 हजार 700 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला. त्यानंतर अनेक चित्रपट समीक्षकांनी सांगितलं की सलमानच्या चाहत्यांची संख्या पाहता हा आकडा खूप कमी आहे. पण ईद, शनिवारी आणि रविवार म्हणजेच विकेंडला चांगली कमाई करू शकेल अशी आशा अनेकांना आहे. येत्या दोन दिवसात चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होईल याची त्याच्या चाहत्यांना आशा आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमान खानचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. मात्र, या चित्रपटानं प्रेक्षकांच्या अपेक्षा भंग केल्या आहेत. असे अनेकांचे म्हणणे आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव झाला आहे.एका नेटकऱ्यानं सलमानच्या टायगर चित्रपटातील एक सीन शेअर केला आहे. त्यात पुढे त्यानं म्हटलं आहे की सलमानचा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक फुटपार्थवर झोपले असतील आणि सलमान येईल आणि त्यांच्यावरून गाडी घेऊन जाईल याची प्रतिक्षा करत असतील. दुसरा नेटकरी म्हणाला, वीरम चित्रपटाचा हिंदी व्हर्जन पाहण्यासाठी फुकट पैसे वाया घालवू नका. तिसरानेटकरी म्हणाला, सलमान खानचा चित्रपट पाहिल्यानंतर थिएटरमधून बाहेर आलेले लोक कसे दिसतात आणि त्यांना जीवंत असल्याचा आनंद दिसतो.  

हेही वाचा : र्यन नीसाला पळवून घेऊन गेला तर? करणच्या प्रश्नावर काजोलचं उत्तर ऐकूण घाबरला शाहरुख

दरम्यान, या चित्रपटात सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत पूजा हेगडे दिसत आहे. तर त्यांच्याशिवाय वेंकेटेश डग्गुबाती, जग्गु भाई, शहनाज गिल, पलक तिवारी राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर त्याशिवाय या चित्रपटात राम चरणनं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.