Salman Khan Relationship Advice: सलमान खान हा आपल्या दबंग अभिनयासाठी चांगलाच ओळखला जातो. त्यांच्या रिलेशनशिपचीही अनेकदा चर्चा रंगताना दिसते आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे सलमान खान यांच्या एका व्हायरल वक्तव्याची. तेव्हा त्यानं एक रिलेशनशिप सल्ला दिला होता. सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांचे अफेअर हे अनेकदा गाजले आहे. त्या दोघांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा त्यांचीच चर्चा सुरू झाली आहे. सध्या सलमान खानचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात तो एक रिलेशनशिप एडव्हाईस देताना दिसतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सलमानची चर्चा रंगलेली आहे. काहींनी यावेळी त्याला ट्रोल केलं आहे. तर अनेकांनी ऐश्वर्यावरून त्याला चिडवण्यातही आलं आहे. तर काहींनी त्याच्या या सल्ल्याचीही खिल्ली उडवली आहे. यावेळी नक्की काय तो म्हणाला आहे हे या लेखातून जाणून घेऊया.
यावेळी चर्चा आहे ती म्हणजे सलमान खानची. यावेळी हा व्हिडीओ बिग बॉस 16 मधला दिसतो आहे. त्यावेळी तो तिथल्या काही सदस्यांना रिलेशनशिप सल्ला देताना दिसतो आहे. यावेळी या व्हिडीओमध्ये शालीन भनोट, टीना दत्ता, सुम्बुल तकीर असे कलाकार दिसत आहेत. यावेळी तो त्यांना सल्ला देतो की, ''जेव्हा तुम्ही कोणाच्या डोळ्यात पाहता तेव्हा प्यार, मोहब्बत, इश्क, चिंता, एहसास, तेव्हा असं करा की 2 मिनिटात तुम्ही तेथून निघून जाल.'' सध्या त्याच्या या व्हिडीओवर सर्वांनी नानाविध कमेंट्स केल्या आहेत. त्यातून त्याला ट्रोलही केलं आहे. यावेळी नक्की ट्रोलर्स काय म्हणाले आहेत हे आपण पाहुया.
यावेळी काही ट्रोलर्स म्हणाले की, ''हे ऐश्वर्यानं केलं होतं परंतु तेव्हा सलमान भाई विचार आचार टाकायला गेले होते?'' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''भाई म्हणतायत की, ''जेव्हा तुम्हाला कोणी पसंत करत नाही तेव्हा तिथून पळा, लवकर पळा''
मागे एकदा सलमान खाननं करण जोहरच्या 'द कॉफी विथ करण' या शोमधून हजेरी लावली होती. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली होती. तेव्हा सलमान खाननं आपण व्हर्जिन आहोत की नाही? या करणच्या प्रश्नावर उडत उडत उत्तर दिले होते. त्यामुळे त्याची तेव्हाही जोरात चर्चा होती. त्यावेळी आपल्या आणि संगीत बिजलानीच्या नात्यावरही त्यानं भाष्य केले होते. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्या दोघांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या, असंही त्यानं सांगितले होते.