Salman Khan in Juna Furniture : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते- दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांचं आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांची किती चांगली मैत्री आहे, याविषयी आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. फक्त सलमान खान नाही तर त्याच्या कुटुंबासोबत महेश मांजरेकर यांचे खूप चांगले संबंध आहेत. महेश मांजरेकर यांच्या जुनं फर्निचर या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजच्या कार्यक्रमात देखील सलमान खानचे वडील आणि लोकप्रिय लेखक सलीम खान यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकरांनी सांगितलं की जुनं फर्निचर या चित्रपटात आधी सलमान खान दिसला असता.
महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत 'लोकमत फिल्मी'ला दिलेली आहे. या मुलाखतीत महेश मांजरेकर यांना प्रश्न विचारण्यात आला की सलमानसोबतची तुमची खूप जुनी मैत्री आहे, हा चित्रपट तुम्ही करतायत तुमचं याविषयी त्याच्याशी बोलणं झालं असेल किंवा त्यानं ट्रेलर पाहिला असेल तर त्यावर सलमाननं काय प्रतिक्रिया होती? यावर उत्तर देत महेश मांजरेकर म्हणाले, "जेव्हा हा चित्रपट मी हिंदीत करणार होतो. तेव्हा उपेंद्रची भूमिका त्याला कर म्हणून सांगितली होती. त्याला खूप आनंद झाला होता आणि त्यानं त्यासाठी होकारही दिला होता. त्याला हा चित्रपट प्रचंड आवडला. मी ईदच्या दिवशी जेव्हा त्याच्या घरी गेलो होतो, तेव्हा भेटल्यावर त्यानं पहिला प्रश्न विचारला की कभी दिखा रहा है पिक्चर? उद्या सलीम साहेब पिक्चर बघणार आहेत. त्यांनी स्वत: हून मला फोन केला होता कभी दिखा रहा है पिक्चर? त्यांनी मी माझे सगळे पिक्चर दाखवतो. एक लेखक म्हणून त्यांचं खूप मोठं नाव आहे. सलमानगी एक दोन दिवसात हा चित्रपट पाहणार. त्याला हा विषय खूप जास्त आवडलाय."
हेही वाचा : 'तारक मेहता…' चा प्रसिद्ध अभिनेता ‘सोढी’ बेपत्ता, वडिलांची पोलिसांत तक्रार
दरम्यान, या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर यात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब आणि शरद पोंक्षे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी लिहिले आहेत. तर यतिन जाधव हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर काल 26 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याशिवाय सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर'.