एकेकाळी दोन वेळचं जेवणही मिळत नव्हतं, सामंथा रुथ प्रभूने सांगितला तिचा संघर्ष 

साऊथची सुंदर अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या खूप चर्चेत आहे.

Updated: Aug 8, 2022, 09:43 PM IST
एकेकाळी दोन वेळचं जेवणही मिळत नव्हतं, सामंथा रुथ प्रभूने सांगितला तिचा संघर्ष  title=

मुंबई : साऊथची सुंदर अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या खूप चर्चेत आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमामुळे देशभरात तिच्या लोकप्रियतेचा आलेख झपाट्याने वाढला आहे. करण जोहरच्या 'करण विथ कॉफी 7' या चॅट शोमध्ये सहभागी झाल्यामुळेही ती चर्चेत राहिली. साऊथसोबतच आता बॉलिवूडमध्येही एंट्री करण्याची तिने तयारी सुरू केली आहे. समंथा तिच्या कारकिर्दीत खूप पुढे गेली आहे आणि आज ती जिथून उभी आहे त्या भूतकाळाकडे पाहताना तिला स्वतःचा एक खडतर संघर्ष दिसतो.

नुकतंच एका कॉलेजमध्ये दिलेल्या भाषणात समंथाने तिच्या स्ट्रगलिंग दिवसांबद्दल सांगितलं आणि हे देखील सांगितलं की, तिला पैशांची इतकी चणचण भासू लागली होती की, दोनवेळचं जेवण मिळणं सुद्धा कठिण होऊन बसलं होतं.

पैशांअभावी खूप त्रास सहन करावा लागला
एका रिपोर्टनुसार, विद्यार्थ्यांना संबोधित करताना समंथा म्हणाली, ''मी सुमारे दोन महिने फक्त एकच वेळचं जेवण जेवत होते. मी वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या आणि आज मी इथे आहे. जर मी हे करू शकते तर तुम्हीही हे करू शकता."

सामंथा रुथ प्रभूने हे देखील सांगितलं की, तिचे पालक तिला तिच्या महाविद्यालयीन दिवसात कठोर अभ्यास करण्यास सांगायचे आणि तिने ते केलं देखील. सामंताला पुढे शिकवण्यासाठी तिच्याकडे पैसे नसले तरी तिने कधी हार मानली नाही आणि आज ती लाखो लोकांची प्रेरणा आहे.