बॉलिवूडचा सुपरस्टार उतरणार मैदानात, जोरदार तयारी सुरु

 जर्सी विकत घेण्यासाठी मैदानात उतरणार अभिनेता

Updated: Nov 23, 2021, 07:52 PM IST
बॉलिवूडचा सुपरस्टार उतरणार मैदानात, जोरदार तयारी सुरु title=

मुंबई : शाहिद कपूर, मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर यांच्या 'जर्सी' चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. याआधी चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं होतं. ट्रेलर रिलीज झाल्यापासून तो व्हायरल होत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा एक स्पोर्ट्स ड्रामा असणार आहे, ज्यामध्ये क्रिकेटरचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

ट्रेलरमध्ये शाहिद कपूरची दमदार स्टाइल पाहायला मिळत आहे. मृणाल ठाकूर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. एक खेळाडू क्रिकेट सोडून आपल्या मुलाची जर्सी विकत घेण्यासाठी मैदानात कसा परततो हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

याआधी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत शाहिदनं लिहिलं होतं की, "ही वेळ आली आहे. ही भावना तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आम्ही २ वर्षे वाट पाहिली. ही स्टोरी खास आहे. ही टीम खास आहे. हे पात्र खास आहे. धन्यवाद. माझ्याकडे शब्द नाहीत. वर्णन करण्यासाठी. मला आशा आहे की, तो खेळताना मला काय वाटलं तेच तुम्हा सर्वांना वाटलं असेल."

गौतम तिननुरी दिग्दर्शित जर्सी या चित्रपटातून शाहिद जवळपास दोन वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. यापूर्वी शाहिद कपूर 'कबीर सिंह'मध्ये दिसला होता. कबीर सिंग सुपरहिट ठरला. या सिनेमात शाहिदशिवाय मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 31 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.