Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. श्रद्धा कपूरे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहयला मिळते. नुकतीच श्रद्धानं एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं सांगितली की तिच्या आईनं तिच्या कानशिलात लगावली... नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया...
श्रद्धा कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. यात श्रद्धानं गुलाबी रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे. पहिल्या फोटोत श्रद्धानं तिचा एक हात तिच्या गालावर ठेवला आहे. त्यानंतरच्या फोटोंमध्ये श्रद्धानं काही छान पोज दिल्या आहेत. हे फोटो शेअर करत श्रद्धानं कॅप्शन दिलं आहे की "काही नाही, आईनं काना खाली लगावली..." (आईनं कानशिलात लगावली) त्यावर नेटकरी तिला विविध कमेंट करु लागले आहेत.
श्रद्धाची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, "आई बोलते की बस झालं आता उठ, मीम्स वाचा." दुसरा नेटकरी म्हणाला, "आईला सांग कानाच्या मागे काळा टिका लावायला." तिसरा नेटकरी म्हणाला, "मलाही कानशिलात लगावते आई.' आणखी एक नेटकरी म्हणाला, "आईसमोर कोणाचंही चालत नाही." दुसरा नेटकरी म्हणाला, "आई समोर कोणी काही बोलू शकतं का?" तिसरा नेटकरी म्हणाला, "श्रद्धा तू फार सुंदर दिसतेस."श्रद्धा कपूरच्या या लूकनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
तर तिचा या कार्यक्रमातील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला. या व्हिडीओत श्रद्धा काही पापाराझींसोबत दिसते. पापाराझी एका ठिकाणी उभे असल्याचे पाहून ती त्यांच्याकडे जाते आणि बोलते की हे काय सुरु आहे. त्यानंतर तिला कळतं की त्यांची पिझ्झा पार्टी सुरु आहे. तर तिला भूक लागली होती म्हणून तिनं थेट त्यांच्याकडून एक पिझ्झा घेतला. त्यानंतर तिनं त्यांना ट्रिट देणार असल्याचे देखील म्हटले.
हेही वाचा : 'लॉर्ड बॉबी'... गरीब मुलांना आर्थिक मदत केल्यानं नेटकरी करतायत बॉबी देओलची स्तुती
श्रद्धाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सगळ्यात शेवटी गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटात दिसली होती. यात तिच्यासोबत रणबीर कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. दरम्यान, आता श्रद्धा लवकरच 'स्त्री 2' या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरतेनं प्रतिक्षा आहे.