मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. सोनू सूदचं आणखी एक ट्विट आता चर्चेचा विषय बनला आहे. सोनू सूदने मुंबईतील वीज पूरवठा खंडित झाल्यानंतर एक ट्विट केलं आहे. त्यानंतर त्यांच्या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे.
सोमवारी मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. जवळपास 2 तासाहून अधिक वेळानंतर वीज पूरवठा हळूहळू कार्यरत होऊ लागला. पण यामुळे मुंबईची लोकल सेवा ठप्प झाली होती. अनेक शहरांमध्ये लाईट नव्हती. यानंतर मुंबई जशी 2 तासासाठी थांबली होती.
वीज पूरवठा खंडित झाल्यानंतर अनेकांनी सरकारवर टीका केली. सोशल मीडियावर देखील संपूर्ण देशात हा चर्चेचा विषय ठरला. सोनू सूदने देखील या मुद्द्यात हात घातला आणि एक ट्विट केलं.
सोनू सूदने म्हटलं की, 'मुंबईमध्ये 2 तास लाईट नव्हती तर संपूर्ण देशाला माहित पडलं. पण देशात आज देखील अशी अनेक घरं आहेत ज्यांना दिवसभरात 2 तासासाठी देखील वीज मिळत नाही. त्यामुळे कृपया संयम ठेवा.' सोनू सूदच्या या ट्विटवर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.