ना चर्चा, ना प्रमोशन, तरीही 'या' चित्रपटाने केली बजेटपेक्षा 4 पट अधिक कमाई, आज ओटीटीवर होतोय रिलीज

डिस्ने प्लस हॉटस्टारवर आज 'सूक्ष्मदर्शिनी' हा नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर बजेटच्या 4 पट कमाई केली आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 11, 2025, 01:04 PM IST
ना चर्चा, ना प्रमोशन, तरीही 'या' चित्रपटाने केली बजेटपेक्षा 4 पट अधिक कमाई, आज ओटीटीवर होतोय रिलीज title=

Sookshmadarshini OTT release: ओटीटी प्लेटफॉर्म प्रत्येक आठवड्याला नवनवीन चित्रपट किंवा वेब सीरिज रिलीज होत असतात. आज 11 जानेवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर एक नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहे. ज्याने बॉक्स ऑफिसवर कोणतीही चर्चा नसताना त्यासोबतच प्रमोशन न करता बजेट पेक्षा 4 पट अधिक कमाई केली होती. या चित्रपटाचे नाव आहे 'सूक्ष्मदर्शिनी'. हा चित्रपट कॉमेडी मिस्ट्री थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटात बेसिल जोसेफ आणि नजरिया नाजिम फहाद मुख्य भूमिकेत होते. 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमी दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. अशातच आता हा चित्रपट हिंदी, तमिल, मल्याळम, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. 

या चित्रपटाचे बजेट 14 कोटी रुपये इतके होते. 'सूक्ष्मदर्शिनी' हा 2024 चा भारतीय मल्याळम भाषेतील ब्लॅक कॉमेडी मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन M.C. Jithin यांनी केले आहे. लिबिन टी.बी आणि अतुल रामचंद्रन यांनी लिहिलेल्या या चित्रपटाने भारतात 27.92 कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटाने जगभरात 54.36 कोटींची कमाई केली आहे. ज्यामध्ये 22.25 कोटी रुपयांची कमाई ही परदेशातील आहे. 

काय आहे चित्रपटाची कथा?
 
'सूक्ष्मदर्शिनी' चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर कथा प्रियदर्शनी उर्फ ​​प्रिया भोवती फिरते. जी तिचा पती अँटोनी आणि त्यांची तरुण मुलगी कानी सोबत आनंदामध्ये आयुष्य जगत आहे. शेजारच्या महिलांशी चांगली मैत्री आहे. पण ग्रेस बेकर्सचा मालक मॅन्युएल त्याच्या वृद्धांसोबत राहतात मदर ग्रेस त्यांच्या हाऊसिंग कॉलनीत तेव्हा मॅन्युअल स्थानिक लोकांचे लक्ष वेधून घेते. परंतु प्रियाला तिच्यावर संशय येतो आणि तिच्यावर लक्ष ठेवण्याचे ठरवते. त्यामुळे अनेक सत्य समोर येतात.

सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा सुरुये. कारण या चित्रपटाचे ना प्रमोशन करण्यात आले, ना या चित्रपटाची चर्चा होती. तरी देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बजेट पेक्षा 4 पट अधिक कमाई केली आहे.