लवकरच कतरिनासोबत रोमान्स करताना दिसेल रणवीर, पण....!

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा त्याच्या आगामी ‘पद्मावती’ सिनेमामुळे आधीपासूनच चर्चेत आहे. अशातच त्याच्या नव्या प्रोजेक्टची माहिती समोर येतीये. ‘पद्मावती’नंतर रणवीर झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ मध्ये दिसणार आहे.

Updated: Aug 14, 2017, 01:40 PM IST
लवकरच कतरिनासोबत रोमान्स करताना दिसेल रणवीर, पण....! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा त्याच्या आगामी ‘पद्मावती’ सिनेमामुळे आधीपासूनच चर्चेत आहे. अशातच त्याच्या नव्या प्रोजेक्टची माहिती समोर येतीये. ‘पद्मावती’नंतर रणवीर झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ मध्ये दिसणार आहे.

त्यासोबतच आता तो एका दुस-याच सिनेमात कतरिना कैफसोबत रोमान्स करताना दिसण्याची शक्यता आहे. मात्र यावर दीपिकाचं काय रिअ‍ॅक्शन असेल हे सांगणं कठिण आहे. कारण कतरिना आणि दीपिका यांचा एक्स बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर याच्यामुळे दोघींमधील नातं तसं खास नाहीये राहिलंय.

काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने बॉलिवूड लाईफ डॉट कॉम या वेबसाईटला सांगितले होते की, तो लवकरच रणवीर सिंहसोबत सिनेमा करणार आहे. आणि हा सिनेमा एक अ‍ॅक्शन सिनेमा असेल. रोहितने हेही सांगितले होते की, रणवीर सध्या ‘पद्मावती’ आणि ‘गली बॉय’ मध्ये बिझी आहे. त्यामुळे या सिनेमाचं शूटींग ते पुढील वर्षी करतील. रोहितचा हा सिनेमा तेलुगु सिनेमा ‘टेंपर’ चा रिमेक आहे. मुंबई मिररच्या एका रिपोर्टनुसार, रोहित या सिनेमासाठी रणवीरसोबत कतरिनाला कास्ट करण्याचा विचार करत आहे. 

दरम्यान, कतरिना ही शेवटी ‘जग्गा जासूस’मध्ये दिसली होती. आता तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स असून त्यात ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’सारखा आमिरच्या सिनेमाचाही समावेश आहे. यासोबतच शाहरूखच्या आगामी सिनेमातही ती दिसणार आहे. सध्या ती सलमान खानच्या ‘टायरग जिंदा हैं’ सिनेमाचं शूटींग करत आहे. या तीन खानांसोबत काम केल्यावर कतरिना रणवीरसोबत रोमान्स करताना दिसण्याची शक्यता आहे.