Finally....! ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती, ती घोषणा तारक मेहता फेम बबीतानं केलीच

मी त्यांना 14 वर्षांपासून ओळखते.

Updated: Feb 19, 2022, 12:37 PM IST
  Finally....! ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती, ती घोषणा तारक मेहता फेम बबीतानं केलीच title=

मुंबई : बॉलीवूड आणि टेलिव्हिजनच्या क्षेत्रात अभिनयासोबतच कलाकार इतर क्षेत्रातही हात आजमावत असतात. अशा परिस्थितीत त्या कलाकारांच्या कमाईचा मोठा स्रोत हा ते करत असलेल्या बिझनेसमधून येतो.

आता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम बबिता जी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ताने आपला व्यवसाय सुरू केला असल्याचं बोललं जात आहे. 

मुनमुन दत्ता हिचं स्वत:चं युट्यूब चॅनेल देखील आहे. ती या चॅनेलवर व्हिडिओ शेअर करते. आपल्या युट्यूब चॅनेलवरच तिने व्यवसाय सुरु करण्याबाबत माहिती दिली आहे. नवीन काम सुरु करण्यासाठी ती खूप एक्साईटेड आहे. तिने फूड बिझनेसमध्ये पाऊल ठेवलं आहे. 

मुनमुन दत्ता हिला फॅन 'बबीता जी'च्या नावाने ओळखतात. या मालिकेतील पात्राला खूप लोकप्रियता मिळाली. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओत ती पदार्थ चाखून बघत आहे.ती सुरुवातीपासूनच फुडी आहे. आता एक बिझनेस म्हणून देखील तिने या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. 

या बिझनेस बद्दल सांगताना मुनमुन म्हणाली की, रेड चिली एंटरटेनमेंटचे मालक केयूर सेठ यांच्यासोबत मी हा व्यवसाय सुरु केला आहे. मी त्यांना 14 वर्षांपासून ओळखते.