मुंबई : कन्नड सिनेमाचे दिग्गज अभिनेता पुनित राजकुमार (Puneeth Rajkumar) चे शुक्रवारी निधन झाले. राजकीय सन्मानात पुनीत यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. 46 वर्षीय अभिनेत्याचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. प्रत्येक जण अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत. पुनित गोशाळा, अनाथालय आणि गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च करत असतं. आता पुनित यांच्या निधनानंतर 1800 विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाची जबाबदारी अभिनेता विशालने घेतली आहे.
तामिळ अभिनेता विशाल पुनित राजकुमारचे अधुरे स्वप्न पूर्ण करणार आहे. 1800 विद्यार्थ्यांची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे. विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाची जबाबदारी प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनित राजकुमार यांनी गेल्या वर्षीपासून घेतली होती. अभिनेता पुनित राजकुमारने शुक्रवारी 29 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी दिसत होते. पण, आता दाक्षिणात्य अभिनेता विशालने स्वत: पुढे येऊन या विद्यार्थ्यांना दत्तक घेणार असल्याचं म्हटलं आहे.
काल हैदराबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना विशाल भावूक झाला. त्यांनी पुनित राजकुमारची आठवण काढली आणि सांगितले की तो फक्त एक चांगला अभिनेताच नाही तर एक चांगला मित्रही होता. त्यांचे या जगातून जाणे केवळ चित्रपट जगताचेच नव्हे, तर संपूर्ण समाजाचे आणि त्यांच्याशी निगडित प्रत्येक व्यक्तीचे नुकसान आहे.
विशालने त्याच्या आगामी 'शत्रू' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सांगितले होते. विशालचा नवा चित्रपट 'Anime' हा थ्रिलर चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शक आनंद शंकर आहेत. या चित्रपटात विशाल आणि आर्या मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय ममता मोहनदास, प्रकाश राज आणि मृदालिनी रवी देखील यात दिसणार आहेत. पुनीत राजकुमार त्याच्या फिल्मी कारकिर्दीसोबतच विविध सामाजिक कार्यांसाठीही स्मरणात राहील. वडिलांचे सामाजिक कार्य पुढे नेत त्यांनी 45 मोफत शाळा, 26 अनाथाश्रम, 19 गोशाळे आणि 16 वृद्धाश्रम स्थापन केले. याशिवाय गेल्या वर्षी १८०० विद्यार्थ्यांची जबाबदारीही त्यांनी घेतली. आता विशालने या उदात्त हेतू पुढे नेण्याचा विचार केला आहे.