TMKOC: तारक मेहता (Taarak Mehta) हा लोकप्रिय टेलिव्हिजन शो गेली 14 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अलीकडेच या शोमधील काही कलाकार शो सोडून गेल्याच्या बातम्या वेगाने व्हायरल होत होत्या. त्यावरून टेलिव्हिजन क्षेत्रात नानाविध प्रतिक्रिया उमटल्या लागल्या होत्या आणि त्याचबरोबर प्रेक्षकांमध्येही याबाबत अनेक तक्रवितर्क लावले जात होते.
तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेचे निर्माते असीद मोदी (TMKOC Producer Asid Modi) यांनी सोडून गेलेल्या कलाकरांबद्दल एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्यामते, ते कलाकरांच्या मागण्या पुर्ण करू शकले नाहीत परंतु जे झालं त्यासाठी ते कोणावर आरोप करत नाहीत. बर्याच लोकांनी या शोला बराच काळ अलविदा केला आहे.
या शोचे सर्वांनाच वेड लागले होते त्यामुळे या शोमधून जेव्हा कलाकार शो सोडून गेले होते तेव्हा या शोच्या चाहत्यांना वाईट वाटले होते. अलीकडेच शैलेश लोढा यांच्या जागी सचिन श्रॉफला शोमध्ये आणण्यात आले तेव्हा चाहत्यांना त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही.
हा शो कलाकारांनी का सोडला याबद्दल हळूहळू अनेक कारणं समोर आली होती, काही कारणं समोर आली नाहीत. त्यातून आता शोचे निर्माते असित मोदी यांनी या सगळ्यावर खुलेपणाने आपले मत मांडले आहे. असित मोदी म्हणाले की, 'गेल्या 13-14 वर्षांपासून आम्ही लोकांचे मनोरंजन करत आहोत. आम्ही नवीन कथा आणि कल्पनांवर काम करत आहोत.
जेव्हा जेव्हा कोणी शो सोडतो तेव्हा मला खूप वाईट वाटते कारण माझ्यासाठी संपूर्ण टीम एका कुटुंबासारखी आहे. इतक्या दिवसात आम्हाला एकमेकांची सवय झाली आहे. असित मोदी पुढे म्हणतात की लोकांनी शो सोडावा असे मला वाटत नाही.
शोचे निर्माते पुढे म्हणाले, 'प्रत्येकाच्या स्वतःच्या गरजा असतात, त्यामुळे मी कोणाला दोष देत नाही. कधीकधी मी त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, कारण जीवनात बदल आवश्यक आहे. त्यामुळे हा बदल आपण सकारात्मक पद्धतीने घ्यावा आणि निरोप घेणाऱ्यांना प्रेम आणि आशीर्वाद द्यावेत.'
Thank you आपका आभार आपका स्नेह बना रहे https://t.co/xXLiYbDY8p
— Asit Kumarr Modi (@AsitKumarrModi) September 14, 2022
काही दिवसांपूर्वी बातम्या येत होत्या की काही स्टार्स शो सोडत आहेत कारण त्यांचे शोच्या निर्मात्यांसोबत मतभेद आहेत परंतु आता स्वतःच निर्मात्यांनी याबद्दल खुलासा केला आहे.