मुंबई : संसदेनंतर आता सिनेसृष्टीत देखील राजकारणाचं वातावरण पाहायला मिळत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' यांच्यापाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
नुकताच या सिनेमाचा पोस्टर रिलिज झाला असून अभिनेता विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारणार आहे. 2019 या वर्षी लोकसभा निवडणुका देखील आहेत. यासोबतच भारतीय सिनेमांमधून अनेक मोठ्या नेत्यांचे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर पाहूया 2019 वर्षी राजकारणाशी संबंधित कोणते सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.
'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा सिनेमा खूप चर्चेत आहे. हा सिनेमा देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळावर आधारित आहे. या सिनेमात अभिनेता अनुपम खेर मुख्य भूमिका साकारत आहे. हा सिनेमा 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' हा सिनेमा लेखक आणि मीडिया सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित आहे. विजय रत्नाकर गुट्टे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. हा सिनेमा 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.
पाकिस्तानी उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांच्या 'मंटो'या बायोपिकनंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या 'ठाकरे' या सिनेमामुळे खूप चर्चेत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सिनेमावर हा सिनेमा आधारलेला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे करत आहे. हा सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
खूप दिवसांपासून सिनेमा सुपरस्टार आणि माजी मुख्यमंत्री एन.टी.रामा राव यांच्या जीवनावरील बायोपिक खूप चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर खूप चर्चेत आलं आहे. त्यांच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री विद्या बालन आणि रकुल प्रीत सारख्या अभिनेत्री आहेत. एन.टी.रामा राव आंध्रप्रदेशचे दहावे मुख्यमंत्री आहेत.
दक्षिण भारताची दिग्गज अभिनेत्री आणि राजकीय व्यक्तिमत्व जयललिता यांच्यावर बायोपिक तयार होत आहे. जयललिता या साऊथ सिनेमांमधील हिरोईन आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री देखील राहिल्या आहेत. जयललिता यांच 5 डिसेंबर 2016 रोजी निधन झालं असून 1991 ते 2016 पर्यंत राजकारणात सक्रीय होत्या. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री नित्या मेनन जयललिता यांची भूमिका साकारत आहे.
सोशल मीडियावर कायम ऍक्टिव असणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवर 'ताशकंद' हा सिनेमा तयार करत आहे. हा सिनेमा 2019 मध्ये प्रदर्शित होणार असून या सिनेमात लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनातील महत्वाच्या गोष्टी दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा देखील रिलीज होताना वाद होण्याची दाट शक्यता आहे.