रस्ता अपघातात दोन प्रसिद्ध कलाकारांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

 नेटफ्लिक्सच्या वेब सिरीज त्यांच्या कंटेंटमुळे अनेकदा चर्चेत असतात.

Updated: Jun 18, 2022, 07:34 PM IST
रस्ता अपघातात दोन प्रसिद्ध कलाकारांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी title=

मुंबई : नेटफ्लिक्सच्या वेब सिरीज त्यांच्या कंटेंटमुळे अनेकदा चर्चेत असतात. मात्र, आता या प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या 'द चोजन वन' या वेबसिरीजबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. खरं तर, नुकतीच या सिरीजची संपूर्ण टीम एका रस्ता अपघाताची शिकार झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात 2 कलाकारांना जीव गमवावा लागला.

गाडीचा तोल बिघडला
उत्तर पश्चिम मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्निया सूर द्वीपकल्प प्रदेशात, सिरीजची संपूर्ण टीम एकाच गाडीतून प्रवास करत होती. यादरम्यान एक भीषण अपघात झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात वाळवंट परिसरात झाला. त्यावेळी गाडीचा वेग खूप जास्त होता. त्यामुळे वाहनाचा तोल गेला आणि कार पलटी झाली.

2 कलाकारांचा जागीच मृत्यू झाला
या अपघातात जुआन फ्रान्सिस्को गोन्झालेझ आणि रायमुंडो गार्डुनो क्रूझ या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर, टीममधील 6 जण अजूनही गंभीर जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता या बातमीमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.