Bollywood Celebs Who Served In Indian Army: आज आपण पाहतो की सगळीकडेच मल्टिटास्किंगचा जमाना आहे. त्यामुळे आपल्यालाही त्याप्रमाणे अपग्रेड हे व्हावे लागते. बॉलिवूडमध्ये सध्या मल्टिटाक्सिंगचा ट्रेण्ड आला आहे. अभिनयासोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी हे बिझनेस करतानाही दिसत आहेत. परंतु आता हा ट्रेण्ड वाढत असाल तरी आधी अभिनयापासून सुरूवात आणि मग दुसरं एखादं नवं काम असा फंडा रूजता दिसतो आहे. पण तुम्हाला माहितीये का की बॉलिवूडमध्ये किंवा अभिनयात येण्यापुर्वा सैन्यदलात होते. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल परंतु या नावांमध्ये बॉलिवूडच्या सर्वात नामवंत अभिनेत्यांची नावं आहेत. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की नावांच्या यादीत नक्की कोणाची नावं आहेत?
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते विक्रमजीत कंवरपाल यांचे नावं तुम्ही ऐकलेच असेल. विक्रम यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून भुमिका केल्या आहेत. त्यांच्या मालिकाही प्रचंड गाजल्या आहेत. एवढंच काय तर त्यांनी सध्याच्या आघाडीच्या माध्यमातून म्हणजेच ओटीटीमधूनही उत्तम भुमिका केल्या आहेत. त्यांनी जब तक हैं जान, टू स्टेटस, 24 या चित्रपटांतून भुमिका केल्या आहेत. 2002 साली त्यांनी मेजर म्हणून निवृत्ती घेतली. त्यानंतर ते बॉलिवूडमध्ये आले.
कवी आणि गीतकार आनंद बक्षी यांनीही भारतीय सैन्यदलात मोठं काम केलं आहे. ते रॉयल इंडियन नेव्हीमध्ये 2 वर्ष कॅडेट म्हणून सक्रिय होते. आनंद बक्षी यांनी कुली, शेहेनशाह, दिलवाले दुल्हनिया ले जाएगें, दिल तो पागल हैं अशा चित्रपटांच्या गाणी लिहिली आहेत. त्यांनी 3 हजाराहून अधिक गाणी लिहिली आहेत. आपले शिक्षण संपवल्यानंतर त्यांनी भारतीय नौदलात नोकरी घेतली. 2002 साली त्यांचे निधन झाले.
रूद्राशिष मजूमदार हा अभिनेता देखील याआधी सैन्यदलात होता. शाहिद कपूरसोबत जर्सी आणि सुशांत सिंग राजपूतसोबत छिछोरे या चित्रपटांतून त्यानं कामं केली आहेत. 7 वर्ष तो मेजर म्हणून सैन्यदलात होता.
3 इडियट्स या चित्रपटातील ते आमीर खानवर रागावलेले प्रोफेसर आठवतात का? त्यांनी या चित्रपटांसोबतच लगे रहो मुन्नाभाई, दबंग 2, परीनिता अशा चित्रपटांमधूनही कामं केली आहेत. ते भारतीय सैन्यदलात रिटायर्ड कॅप्टन म्हणून 1967 साली निवृत्त झाले. त्यांनी वयाच्या 44 व्या अभिनयाला सुरूवात केली.
महाभारतात शकुनी मामाची भुमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांनीही भारतीय सैन्यदलात उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. याचसोबतच त्यांनी सीआयडी, भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप या लोकप्रिय हिंदी मालिकांतूनही कामं केली आहेत. त्यांनीही आपलं अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू असताना सैन्यदलात नोकरी घेतली होती.