'या' कारणांमुळे मिथुन चक्रवर्ती कित्येक दिवस घालत होते मकटलेले कपडे

 मिथुनला खऱ्या आयुष्यात घाणेरडे कपडे घालणे अजिबात आवडत नाहीत पण असं काय घडलं की ज्यामुळे त्यांना हे करावं लागलं वाचा सविस्तर

Updated: Mar 13, 2021, 04:45 PM IST
'या' कारणांमुळे मिथुन चक्रवर्ती कित्येक दिवस घालत होते मकटलेले कपडे title=

मुंबई : असं म्हणतात की, चित्रपटांमध्ये पात्र साकारण्यासाठी व्यक्तिरेखासुद्धा जगली पाहिजे. आपल्या चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या व्यक्तिरेखेला उत्तम प्रकारे साकारण्यासाठी जगतात. अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun chakraborty)  यांनीही आपल्या भूमिकेसाठी हे केले. मिथुनला खऱ्या आयुष्यात घाणेरडे कपडे घालणे अजिबात आवडत नाही पण त्याच्या एका भूमिकेसाठी त्याने बरेच दिवस मळलेले कपडे घातले होते. 

या चित्रपटामध्ये घातले मळखटलेले कपडे
मिथुन दा यांनी 'जोर लगा के हय्या' हा चित्रपट केला. या चित्रपटात अभिनेत्याला भिकाऱ्याचं पात्र साकारायचे होते आणि सतत तोच ड्रेस घालायचा होता. कारण एका भिकार्‍याकडे दररोज कपडे बदलण्यासाठी पुरेसे पैसे नसतात. तर मिथुन दा अनेक दिवसांपासून भिकारी व्यक्तीचं पात्र स्क्रीनवर उत्तम प्रकारे सादर करण्यासाठी घाणेरडे कपडे घालत होते. मिथुन दा यांनी ते कपडेसुद्धा धुतले नव्हते. कपडे घाणेरडे वाटावे अशी त्याची इच्छा होती जेणेकरून त्याची भूमिकेला वास्तविकतेची जोड मिळेल.

मिथुन चक्रवर्तीचे सिनेमातील पदार्पण
मिथुनने १९७६ मध्ये 'मृगया' या चित्रपटाद्वारे चित्रपट जगात प्रवेश केला. त्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार ही त्यांना मिळाला. मिथुन दा यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटापासून प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण केली. मिथुनने अमिताभ बच्चन, राजेश खत्रा आणि जितेंद्र या मोठ्या कलाकारांसोबत काम केले. मिथुन चक्रवर्ती यांच्या 'डिस्को डान्सर' या चित्रपटानेही लोकांवर बरीच जादू केली होती. 'आय एम डिस्को डान्सर' चित्रपटाच्या गाण्याने गोंधळ उडाला आणि लोकांनी या गाण्यात दिसणाऱ्या मिथुनच्या स्टाईलची कॉपी करण्यास सुरवात केली.  मिथुन चक्रवर्ती लोकांच्या मनावर विजय मिळवत आहेत. त्याचा अभिनय, हेअर आणि फॅशन स्टाईल लोकांना वेड लावणारी होती.  मिथुनचा चित्रपट येताच चित्रपटगृहे हाऊसफुल व्हायची. त्याचे बहुतेक सर्व चित्रपट हिट होते. एवढेच नव्हे तर लोक बर्‍याच वेळा एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट पाहत असत.
अभिनयानंतर राजकारणात केला प्रवेश
मिथुन चक्रवर्ती या दिवसांमध्ये चर्चेत आले आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे. अभिनेत्याच्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना, २०११ मध्ये अभिनेता तृणमूल कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. टीएमसी पक्षात प्रवेश घेतल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना राज्यसभेचे खासदारही बनवण्यात आले होते, परंतु २०१६ च्या उत्तरार्धात मिथुन चक्रवर्ती यांनी राज्यसभा खासदार पदाचा राजीनामा दिला. तर आता राज्यसभेच्या माध्यमातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.