Tiger 3 Teaser : टायगरची झोया कुठंय? Tiger 3 च्या टीझरमध्ये कतरीना कैफबद्दल मोठी अपडेट!

Tiger 3 Teaser : चाहत्यांची प्रतिक्षा संपली... अखेर 'टायगर 3' चा टीझर प्रदर्शित! पण टायगरची झोया कुठे? कतरिना कैफच्या भूमिकेचं काय झालं... एकदा पाहाच

दिक्षा पाटील | Updated: Sep 27, 2023, 12:37 PM IST
Tiger 3 Teaser : टायगरची झोया कुठंय? Tiger 3 च्या टीझरमध्ये कतरीना कैफबद्दल मोठी अपडेट! title=
(Photo Credit : Social Media)

Tiger 3 Teaser : बॉलिवूडची डायनॅमिक जोडी कतरिना कैफ आणि सलमान खान पुन्हा एकदा बघायला मिळणार आहेत. त्यांचा 'टायगर 3' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'टायगर'च्या फ्रँचायझीमधील हा थरारक भाग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत या चित्रपटाला पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. 'टायगर 3' च्या टीझरनं सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. हा अॅक्शन-पॅक्ड चित्रपट बघण्यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत. 

सलमान खाननं त्याच्या 'टायगर 3' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा टीझर दिवंगत फिल्ममेकर यश चोप्रा यांच्या जन्म दिवसानिमित्तानं शेअर करण्यात आला आहे. 'टाइगर 3' च्या टीझरमध्ये टायगर एक मेसेज देताना दिसत आहे. या मेसेजसोबत चित्रपटाचं प्रमोशन जोरात सुरु झालं आहे. 'टाइगर 3' च्या टीझरमधून एक गोष्ट समोर आली आहे की टायगर म्हणजेच अविनाश राठौर हा देशद्रोही असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अशात टायगरसमोत दोन आव्हानं आहेत. एक म्हणजे स्वत: वर असलेला देशद्रोहीचा आरोप मिटवण्याचा आणि दुसरा मुलाच्या नजरेत हिरो होण्याचा. पण आता तो त्याच्या मुलाच्या नजरेत देशद्रोही असेल की देशभक्त याचा निर्णय हा सरकारला घ्यावा लागणार आहे. टीझरमध्ये सलमान हे देखील बोलताना दिसतोय की जर तो जिवंत राहिला तर देशाच्या सेवेसाठी नेहमीच राहिल, नाही तर जय हिंद!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : वॉकइन क्लॉझेट ते ऐसपैस जागा... मुंबईकर सई ताम्हणकरचं स्टायलिश नवं घर; पाहा

मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' त्याच्या अँक्शन चित्रपटाची मेजवानी सगळयांना अनुभवायला मिळणार आहे. हा अफलातून थ्रिलर चित्रपट आता मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार असून काय वेगळं असणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 'टाइगर 3' चा बजेट हा 300 कोटींचा आहे. हा चित्रपट यशराज फिल्मसचा आता पर्यंतचा सगळ्यात महागडा चित्रपट आहे. चित्रपटाच्या व्हिएफेक्ससाठी खूप जास्त खर्च करण्यात आला आहे. हा चित्रपट आधी 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, पण आता 10 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. 'टायगर 3' च्या टीझरनं लक्ष वेधून घेतले असून हा चित्रपट नक्कीच हिट होणार अशी आशा सलमानच्या चाहत्यांना आहे. कतरिना विषयी बोलायचे झाले तर ती वर्षाच्या अखेरीस विजय सेतुपतीसह 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटात दिसणार आहे.