अनेक दिवस उलटूनही प्रियकराच्या आठवणींनी संजूबाबची लेक भावूक

काही दिवसांपूर्वीच त्याचं निधन झालं होतं. 

Updated: Jul 30, 2019, 01:20 PM IST
अनेक दिवस उलटूनही प्रियकराच्या आठवणींनी संजूबाबची लेक भावूक title=

मुंबई : कित्येक वेळा असे मानले जाते की सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबाला केणत्याही समस्यांना सामोरे लागत नाही. पण, मुळात तसं नसतं. काही गोष्टी अशा असतात ज्या भावनांनी बांधलेल्या असतात. अशाच भावनिक बंधांची अनुभूती अभिनेता संजय दत्त याच्या मुलीला होत आहे. आपल्या अगदी जवळचा व्यक्ती आपल्यापासून कायमचा दूर गेल्यानंतर त्या दुःखातून बाहेर येणे फार कठीण असते. संजूबाबाची लेक म्हणजेच त्रिशाला दत्त ही सध्या अशाच परिस्थितीचा सामना करत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It took every fiber in my being to pick myself up, get ready, smile, & attend a phenomenal wedding this weekend of one of my closest friends beautiful sister. My bestie looked exceptionally stunning & the bride looked breathtakingly beautiful. These few weeks have been excruciating for me but I’m doing my best to be okay. I miss him SO much  I love him so much. He adored me just as much as I adored him. Thank you @experience.fp & @mua_mar for coming all the way from Los Angeles & Las Vegas just to cheer me up & make me look & feel beautiful. You create magic together & as always, I’m very grateful for you both. Thank You 

 

काही दिवसांपूर्वीच त्रिशालाच्या प्रियकराचं निधन झालं. आपल्या आयुष्यात एक महत्त्वाचं स्थान असणाऱ्या व्यक्तीचं एकाएकी निघून जाणं, म्हणजे त्रिशालासाठी एक मोठा धक्का होता. याच धक्क्यातून तिने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्नही केला. पण, तरीही ती प्रियकराच्याच आठवणींमध्ये गुंतलेली दिसत आहे. 

बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर त्रिशाला फार दुःखी होती. याची प्रचिती तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून आली. नुकताच त्रिशालाने आणखी एक पोस्ट केली आहे. पण, यातही प्रियकराविषयी लिहिणं मात्र ती विसरलेली नाही. 

मैत्रीणीच्या बहिणीच्या लग्नासाठी त्रिशाला गेली होती. त्यावेळी सजणं, समारंभासलाठी तयार होणं, या गोष्टी तिच्यासाठी अत्यंत कठिण होत्या. पण, तरीही तिने त्या मोठ्या धीराने पार पाडल्या. यादरम्यान, प्रियकराच्या आठवणीने तिला भावनाही अनावर झाल्या. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने भावनांना वाट मोकळी करुन दिली. सोबतच या प्रसंगी तिला साथ देणाऱ्या काही खास व्यक्तींचे आभारही मानले.