या व्यक्तीने तुषार कपूरला दिली 'सिंगल पॅरेंट' होण्याची आयडिया

कुणी दिला हा सल्ला 

या व्यक्तीने  तुषार कपूरला दिली 'सिंगल पॅरेंट' होण्याची आयडिया  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर 20 नोव्हेंबर रोजी 42 वर्षांचा झाला. तुषार कपूर बॉलिवूडमधील पहिला पुरूष अभिनेता आहे जो सिंगल पॅरेंट आहे. तुषारच्या मुलाचा लक्ष्यचा जन्म हा 1 जून 2016 रोजी सरोगसीच्या माध्यमातून झाला. तुषार कपूरच्या सिंगल पॅरेंटची बातमी सगळ्यांनाच धक्कादायक होती. तुषार कपूरने असा निर्णय का घेतला? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. 

तुषार कपूरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, बॉलिवूडचे फिल्ममेकर प्रकाश झाने त्याला सिंगल पॅरेंट होण्याचा सल्ला दिला होता. प्रकाश झा आणि तुषार कपूरची एका विमानात ओळख झाली. त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिला. 

प्रकाश झा यांनी सुरूवातीला तुषारला तुझा लग्नाचा काय विचार आहे? तेव्हा तो म्हणाला की, त्याला अरेंज मॅरेज नाही करायचं आणि कुणाशी प्रेम होत नाही. अशावेळी प्रकाश झा यांनी त्याला सिंगल पॅरेंट होण्याचा सल्ला दिला. 

तुषार सांगतो की, प्रकाश झा हे स्वतः सिंगल पॅरेट आहे. त्यांनी एका मुलीला दत्तक घेतलं आहे. आज या गोष्टीला अनेक वर्ष झाली असून ते खूष आहेत. प्रकाश झा यांनी त्याला एका फॅमिलीचा नंबर देखील दिला. 

तुषारने सांगितलं की, त्याला सर्वात जास्त सपोर्ट हा मोठी बहिण एकता कपूरकडून मिळाला. एकता आणि लक्ष्यची खूप चांगली बॉन्डिंग आहे.