Urfi Javed : बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशनसाठी ओळखली जाते. उर्फी ही तिच्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. उर्फी नेहमीच तिच्या कपड्यांसोबत एक्सपेरिमेंट करताना दिसते. कधी प्लास्टिक बॅग, कधी सिम कार्ड, कधी सायकलची चेन तर कधी काय तर कधी काय. उर्फी जावेदनं आजवर वेगवेगळ्या गोष्टींपासून स्वत: चे ड्रेस बनवले आहेत. पण आता उर्फीनं झाडाच्या खोडापासून ड्रेस बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा व्हिडीओ उर्फीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
उर्फी जावेदनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फीनं एका झाडा जवळ उभी असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत ती झाडाकडे बोट करते आणि नंतर याचं काय करायला हवं असं विचारताना दिसते. त्यानंतर उर्फीचा दुसरा व्हिडीओ येतो ज्यात उर्फीनं झाडाच्या खोडापासून हा ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ शेअर करत उर्फीनं कॅप्शन दिलं की हा ड्रेस बनवण्यासाठी कोणत्याही झाडाला तोडण्यात आलं नाही किंवा इजा पोहोचवण्यात आली नाही. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा : साडी 3 हजारांची, हॉल 11 हजारांचा... बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नाची बातच न्यारी एकूण खर्च फक्त 1.5 लाख
उर्फीच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, कॉन्डम पासून ड्रेस बनव. दुसरा नेटकरी म्हणाला, टट्टीचा ड्रेस. तिसरा नेटकरी म्हणाला, ड्रेस वगैरा तर ठीक आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, वाचून रहा नाही तर चिमणी घरट बनवेल. दुसरा नेटकरी म्हणाला, मी हेच बोलणार होती की हिनं सगळ्या गोष्टींपासून ड्रेस बनवला आहे आणि फक्त गाईच्या शेणापासून बनवण्याचा बाकी आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, यार आज हिनं कसा गाईच्या शेनापासून बनवली आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, या जगात आता फक्त टट्टी राहिली आहे ज्याचा तू ड्रेस नाही बनवलास आता ते पण करून टाक. दुसरा नेटकरी म्हणाला, जर तू खरंच इतकी क्रिएटीव्ह आहेस तर तुला कान्समध्ये का बोलावलं नाही. तिसरा नेटकरी म्हणाला, मला वाटलं शेणाच्या गोवऱ्या आहेत. आणखी एक नेटकरी म्हणाला, सरकारनं 2 हजारच्या नोट नाही हिला बंद करायला पाहिजे. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्फीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिचे असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो.