'भारत सोडून पाकिस्तानात ये', शाहरूखसमोर प्रस्ताव

आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे शाहरूखचं कुटूंब चिंतेत 

Updated: Oct 27, 2021, 09:58 AM IST
'भारत सोडून पाकिस्तानात ये', शाहरूखसमोर प्रस्ताव  title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान चार ऑक्टोबरपासून नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) च्या ताब्यात आहेत. अजून त्याला जामीन मिळालेला नाही. आर्यन खानला क्रूझवर सुरू असलेल्या रेव पार्टीमधून ताब्यात घेतलं आहे. एनसीबीचा आरोप आहे की, आर्यन खान ड्रग सिंडिकेटचा हिस्सा आहे. 23 वर्षांचा आर्यन खान अटकेत असल्याची चर्चा पाकिस्तानमध्ये देखील आहे. 

पाकिस्तानमधील स्टार्स आणि सेलिब्रिटी देखील आर्यन खानच्या अटक प्रकरणात शाहरूख खानचं समर्थन करत आहेत. पाकिस्तानमधील लोकप्रिय एँकर वकार जाकाने शाहरूख खानच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. पाकिस्तानचे होस्ट वकार झाका यांनी ट्विट केले, "शाहरुख खान सर, भारत सोडून तुमच्या कुटुंबासह पाकिस्तानात स्थायिक व्हा. नरेंद्र मोदी सरकार तुमच्या कुटुंबासोबत जे करत आहे ते योग्य नाही. मी शाहरूख खानसोबत आहे.' .या ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. 

वकारच्या या ट्विटसाठी काही लोक त्याला सपोर्ट करत आहेत, तर काहींनी त्याची खिल्लीही उडवली आहे. एका युझरने शाहरुखच्या समर्थनार्थ लिहिले, शाहरुख खानची पत्नी हिंदू आहे आणि तो हिंदूचा सण देखील साजरा करतो.  जो पुरुष आपल्या पत्नीच्या धर्माचा आदर करतो. तेच खरं पुरूषत्व आहे. त्याच वेळी, काही युझर्सने वकार झकाला पाकिस्तानच्या चित्रपट उद्योगाच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. 

फुरकान नावाच्या युझरने लिहिले की, "येथे त्याला चित्रपट मिळत नाहीये, तुम्हाला माहिती आहे की आमच्या इंडस्ट्रीची अवस्था उद्ध्वस्त झाली आहे, इथे चांगल्या कंटेंटची आशा नाही.