'काय विचार करून लग्न केलं होतं आणि प्रत्यक्षात...' अक्षय कुमारची धक्कादायक पोस्ट

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना ही जोडी बॉलिवूडची लोकप्रिय जोडीपैकी एक आहे. या जोडीला चाहत्यांचं खूप प्रेम मिळतं. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात आणि एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. आज ट्विंकल खन्ना आपला वाढदिवस साजरा करत आहे. याच निमीत्ताने अभिनेता अक्षय कुमारने आपल्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहे. 

Updated: Dec 29, 2023, 06:02 PM IST
'काय विचार करून लग्न केलं होतं आणि प्रत्यक्षात...' अक्षय कुमारची धक्कादायक पोस्ट title=

मुंबई : अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना ही जोडी बॉलिवूडची लोकप्रिय जोडीपैकी एक आहे. या जोडीला चाहत्यांचं खूप प्रेम मिळतं. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात आणि एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. आज ट्विंकल खन्ना आपला वाढदिवस साजरा करत आहे. याच निमीत्ताने अभिनेता अक्षय कुमारने आपल्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहे. मात्र त्याने दिलेल्या शुभेच्छा जर वेगळ्या अंदाजात आहेत. अभिनेत्याचा त्याच्या पत्नीला शुभेच्छा देण्याचा अंदाज जरा कॉमेडी आहे. 

अक्षयने कॉमेडी अंदाजात केलं बर्थडे विश
ट्विंकल खन्नाच्या वाढदिवसानिमीत्त अक्षयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने ट्विंकल खन्नाची दोन रुप त्याच्या चाहत्यांसमोर आणली. व्हिडीओच्या सुरुवातीला ट्विंकलचा पांढऱ्या ड्रेसमध्ये एक फोटो दिसतोय त्याच्यावर एक टेक्स आहे. यामध्ये लिहीलंय की, क्या देखके मैने शादी की थी आणि याच्या पुढे अजून एक व्हिडीओ आहे ज्यात हल्क पुतळ्याच्या पुढे उभी राहून ट्विंकल कॉमेडी हरकत करत आहे. या व्हिडीओतील पार्टवर दिलं गेलेल्या कॅप्शनमध्ये लिहीलं होतं, आणि खऱं काय आहे. ज्यात पहिल्या फोटोत तिचा लूक खूप सुंदर आहे. तर दुसऱ्या फोटोत तिचा लूक सर्वसाधारण होता. 

अक्षयने ट्विंकलला म्हटलं हल्क
इन्स्टाग्रामवर चाहत्यांसह हा व्हिडिओ शेअर करत ट्विंकल खन्नासाठी अक्षयने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, माझी हल्क तुला दीर्घाआयुषी हो. तुझ्या स्माईलच्या माध्यमातून आमच्या जीवनात एवढी वर्ष जोडण्यासाठी धन्यवाद. देव तुला अजून खूप आयुष्य देवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा टीना.'' अक्षयने ही पोस्ट मजेशीरपणे शेअर केली आहे. दोघेही अनेकदा एकमेकांना अशा मजेदार पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अक्षय कुमार शेवटचा 'मिशन रानीगंज' सिनेमात दिसला होता. याचबरोबर २०२३ मध्ये अक्षय कुमारचे तीन मोठे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये 'सेल्फी' आणि 'ओह माय गॉड 2'चा समावेश होता. सेल्फी पडद्यावर फार काही कमाई करू शकला नाही, पण 'OMG 2' ला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. 'मिशन रानीगंज' बद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटातील अक्षय कुमारच्या कामाच विशेष कौतुकही झालं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. मात्र चित्रपटाच्या कथेचंही खूप कौतुक झालं होतं. लवकरच अक्षय कुमार आणखी अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे, ज्यात 'वेलकम टू जंगर', 'बडो मियाँ छोटे मियाँ' आणि 'हेरा फेरी 3' या सिनेमांचा समावेश आहे.