'त्या गोष्टीला इतकी वर्ष झालीत...', ऐश्वर्या- अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांमध्ये सलमान खानचा VIDEO VIRAL

Salman Khan Talked About Aishwarya Rai's Wedding : सलमान खाननं एका कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नावर वक्तव्य केलं होतं. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 16, 2024, 11:51 AM IST
'त्या गोष्टीला इतकी वर्ष झालीत...', ऐश्वर्या- अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांमध्ये सलमान खानचा VIDEO VIRAL  title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan Talked About Aishwarya Rai's Wedding : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन गेल्या बऱ्याच काळापासून त्यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. दोघं अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकटे दिसून येतात. त्या अफवांवर त्या दोघांपैकी कोणी काही प्रतिक्रिया दिलेल्या नाही. त्यात आता सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या दोघांच्या लग्नाविषयी बोलताना दिसत आहे. 

सलमान आणि ऐश्वर्या बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी कधीच त्यांच्या रिलेशनशिपविषयी स्पष्टपणे काही सांगितलं नाही. मात्र, एकदा सलमाननं एका शो दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नावर चर्चा केली होती. या शो दरम्यान, जेव्हा सलमानला ऐश्वर्याला वाईट वागणूक केल्याच्या आरोपांविषयी विचारलं तेव्हा सलमानला विचारण्यात आलं की सलमान खान ऐश्वर्याच्या घरी गेला आणि त्यानं काच तोडली स्वत: चा हात कापून घेतला. त्यावर प्रतिक्रिया देत लगेच सलमाननं त्याचा हात दाखवला आणि म्हणाला की 'सर, त्यांच्याविषयी काय सांगू. माझं हे म्हणणं आहे की प्रत्येकाची आपली एक पर्सनल लाइफ असते. मी आता त्यावर काही बोलेन तर ते असं होईल की आपल्या आयुष्यात कधी कोणती व्यक्ती असते तिला आपण खोटं ठरवतो.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे नात्यावर काही बोलण्यावर सलमान म्हणाला, 'आता सगळ्यात चांगलं काही असेल तर ते  शांत राहणं आहे. त्या गोष्टीला इतकी वर्ष झालीत. आता ती कोणाची तरी पत्नी आहे. तिनं अभिषेकशी लग्न केलं याविषयी मला खूप आनंद आहे. अभिषेक हा एक चांगला मुलगा आहे. त्याशिवाय एका मोठ्या कुटुंबात तिचं लग्न झालं आणि ते एकत्र आनंदी आहेत. कोणत्याही एक्स बॉयफ्रेंडला हेच अपेक्षित असेल. जेव्हा तुमचं नातं तुटतं आणि त्यानंतर ती व्यक्ती तुम्ही आयुष्यात नाही म्हणून वाईट काळातून जात असते. तेव्हा त्या व्यक्तीनं तुमच्याशिवाय खूप आनंदी रहावं हिच तुमची अपेक्षा असते. त्यामुळे स्वत: साठी एक कारण पण झालं आणि त्याशिवाय आपण दोषी आहोत असं देखील वाटत नाही. हेच योग्य आहे असं मला वाटतं.' 

हेही वाचा : देशातील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री; 10 हजार साड्या, 800 किलो चांदी आणि 28 किलो सोनं; भल्याभल्यांना नमवणारी ती होती तरी कोण?

2002 मध्ये ऐश्वर्या आणि सलमान विभक्त झाले, तर 2007 मध्ये ऐश्वर्यानं अभिषेकशी लग्न केलं. त्याच्या 4 वर्षानंतर त्यांची लेक आराध्याचा जन्म झाला. दोघांच्या लग्नाला आता 17 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.