मुंबईः करण जोहरच्या पार्टीत अनन्या पांडेच्या लूकची चांगलीच चर्चा झाली. लाँग गाऊनमध्ये अनन्या खूपच छान दिसत होती.
25 मे रोजी निर्माता करण जोहरने 50 वा वाढदिवस साजरा केला. या पार्टीत बी टाऊनच्या सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली. या पार्टीला आलेल्या सर्वांचाच लूक पाहण्यासारखा होता मात्र अनन्या पांडेच्या ड्रेसची खास चर्चा होताना दिसतेय.
या पार्टीत अनन्या पांडे दोन वेगवेगळ्या ड्रेसमध्ये दिसली, त्यानंतर आता तिच्या दोन्ही लूकची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
अनन्या पांडे या पार्टीत आली तेव्हा ती अतिशय स्टायलिश आणि सुंदर बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली. तिचा गोल्डन गाऊन तिला छान दिसत होता. एंट्री घेताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
त्याचवेळी, केवळ पार्टीच्या बाहेरच नाही तर पार्टीच्या आतही काही व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अनन्या पांडे पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसत आहे.
आतल्या व्हिडिओमध्ये अनन्या काळ्या रंगाच्या बॅकलेस शॉर्ट ड्रेसमध्ये आहे आणि ती खूप एन्जॉय करताना दिसत आहे.
प्रश्न असा आहे की, काही तासांच्या या पार्टीत अनन्याने दोनदा तिचा ड्रेस का बदलला? वास्तविक, पहिला व्हिडिओ पाहून असे दिसते की, अनन्या गाऊनमध्ये फारशी कम्फर्टेबल नव्हती.
जर तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला तर या गाऊनमध्ये चालणे तिला खूप जड वाटत आहे. कदाचित यामुळेच अनन्या पांडेने पार्टीत प्रवेश करताच तिचा ड्रेस बदलला होता. तिचे दोन्ही लूक अप्रतिम असले तरी सोशल मीडियावर तिच्या स्टाइलचा बोलबाला आहे.