या १० घरगुती उपायांनी केस पुन्हा वाढण्यास मदत होईल!

केसगळती ही आजकालची सामान्य समस्या झाली असून या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत.

Updated: Apr 15, 2018, 07:23 AM IST
या १० घरगुती उपायांनी केस पुन्हा वाढण्यास मदत होईल! title=

मुंबई : केसगळती ही आजकालची सामान्य समस्या झाली असून या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. पण या समस्येवर काही फायदेशीर असे घरगुती उपाय आहेत. या उपायांमुळे केसगळती कमी होऊन केस पुन्हा वाढण्यास मदत होईल. हे सर्व पदार्थ आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात. त्यामुळे आपण ते सहज आजमावू शकतो. तर पाहुया कोणते आहेत हे उपाय...

खोबरेल तेल

खोबरेल तेल हलके गरम करा आणि केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करा. काही वेळाने केस धुवा. खोबरेल तेलामुळे केस स्वस्थ आणि मजबूत होतात.

एरंडेल तेल

टक्कल पडण्यावर एरंडेल तेल हा नैसर्गिक उपाय आहे. यामुळे नवीन केस येण्यास मदत होते. त्याचबरोबर डोक्यावर त्वचा (स्कॉल्फ) चे इंफेक्शनपासून संरक्षण होते. 

दही

दही हे नैसर्गिक कंडीशनर आहे. याच्या वापरामुळे केसांची गळती कमी होते. दह्यातील प्रोटीन्समुळे केसांचे पोषण होते. त्यामुळे दही केसांच्या मुळांशी लावून १५ मिनिटे मालिश करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा.

कोरफड

कोरफडीचा गर केसांना लावल्यास त्याच्यातील इन्जाईम्सने केसांची रोमछिद्र ओपन होतात आणि केसगळती दूर होते.

काळीमिरी

काळीमिरीची पेस्ट बनवा. त्यात लिंबाचा रस घालून हे मिश्रण केसांना लावा. तासाभराने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा केसांवर हा प्रयोग केल्याने नवे केस येण्यास सुरुवात होते.

मध

२ चमचे मध, १ चमचा दालचिनी पावडरमध्ये २ चमचे ऑलिव्ह ऑईल गरम करुन केसांना लावा. २० मिनिटांनी केस धुवा.

लिंबू

१ चमचा लिंबाचा रस २ चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून केसांना लावल्याने फायदा होईल.

कांदा

कांद्याचा रस केसांना लावले अत्यंत फायदेशीर ठरते. कांद्याच्या रसामुळे केसांतील बॅक्टेरीया आणि फंगस नष्ट होते. कांद्याचे तुकडे करुन केसांवर १२-१५ मिनिटे घासल्यास केस लवकर येण्यास मदत होईल.

कापूर

कापूरमुळे केसांतील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि डोक्याला थंडावा मिळतो. अर्धा लिटर खोबरेल तेलात १० ग्रॅम कापूर मिसळून केसांना नियमित लावल्यास केस वाढू लागतात.

मेथी

मेथीचे दाणे वाटून त्याची पेस्ट बनवा. ती पेस्ट स्कॉल्फवर लावा. तासाभराने केस धुवा. हा प्रयोग रोज केल्यास केस पुन्हा वाढीस लागतील.