दिल्ली : कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरियंट भारतात दाखल झाल्याने केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाली आहेत. हा प्रकार सर्वात धोकादायक असल्याचं म्हटलं जातंय. अशातच परदेशातून येणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जातेय. दरम्यान, आंध्र प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. परदेशातून परतलेल्या 30 प्रवाशांबद्दल काहीही माहिती नसल्याचं समोर आलंय.
मुख्य म्हणजे, या व्यक्तींना कोरोनाची लागण झालेली असेल तर त्यांच्यामार्फत इतरांना देखील त्याचा प्रसार होऊ शकतो.
एका न्यूजच्या रिपोर्टनुसार, गेल्या 10 दिवसांमध्ये विदेशातून जवळपास 60 प्रवासी आले होते. यामधून तीन दक्षिण आफ्रिकेमधून आले होते. 60 पैकी 30 प्रवासी विशाखापट्टणममध्ये थांबले आहेत. तर उर्वरित 30 प्रवासी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत आणि त्यांच्याबद्दल आता कोणतीही माहिती नाहीये. सरकार या 30 जणांचा शोध घेतंय. तर काहींनी फोन उचलणेही बंद केलं आहे.
या 30 प्रवाशांचा शोध कसा घ्यायचा हे प्रशासनाला समजत नाही. Omicron प्रकाराचा धोका लक्षात घेता, सरकारने या लोकांची RT-PCR चाचणी करावी लागणार आहे.
Omicron प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेत ओळखला गेला. दक्षिण आफ्रिकेत एका दिवसात 11,500 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, ओमायक्रोन आतापर्यंत किमान 24 देशांमध्ये पसरला आहे.
देशात कोरोना विषाणू ओमायक्रोन धोकादायक प्रकार आणल्यापासून त्याचा झपाट्याने प्रसार होण्याचा धोका वाढला आहे. कर्नाटकातील दोन रुग्णांमध्ये या प्रकाराचे दोन रूग्ण आढळले आहेत. दोन्ही बाधित रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून आले होते.
संयुक्त आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, या रुग्णांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे प्रकरणांची पुष्टी झाली आहे. संक्रमित आढळलेल्या रुग्णांपैकी एक 64 वर्षांचा आहे, तर एक व्यक्ती 46 वर्षांचा आहे.