मुंबई : डागविरहीत, नितळ त्वचा हे सर्वांचेच स्वप्न असते. त्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. महागडे प्रॉडक्ट्स वापरतो. पार्लरमध्ये खर्च करतो. पण घरच्या घरीही थोडीशी काळजी घेतली तर त्वचेचा तजेला टिकून राहण्यास मदत होते. शरीरातील विषद्रव्ये निघून जावून चेहऱ्यावरील तजेला टिकून राहण्यासाठी पिण्याच्या पाण्यात हे पदार्थ मिसळा...
दालचिनीच्या सेवनामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. पिण्याचे पाणी उकळताना त्यात चिमुटभर दालचिनी पावडर आणि सफरचंदाचे काही तुकडे घ्या. त्यानंतर ते गाळून प्या.
चेहऱ्यावरील थकवा दूर करण्यासाठी आणि तजेलदार त्वचेसाठी पिण्याच्या पाण्यात स्ट्रॉबेरीचा रस मिसळा. यात व्हिटॉमिन सी आणि अॅंटीऑक्सीडेंट असतात. त्यामुळे चेहऱ्यावर तजेला येतो.
बॅक्टेरीयांशी लढण्यासाठी मध उत्तम ठरते. मध चेहऱ्याला लावणे जितके फायदेशीर असते तितकेच मध शरीरात घेणेही उपयुक्त ठरते. सकाळी गरम पाण्यात मध घालून प्या.
पुदीन्याचे पाणी प्यायल्याने पोट साफ होते आणि चेहऱ्यावर तजेला येतो. उन्हाळ्यात हे पाणी प्यायल्याने टवटवीत वाटते.
लिंबाचे काही थेंब पाण्यात मिसळ्याने पचनक्रिया सुरळीत होते. शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा चमकदार होण्यास मदत होते.