मुंबई : वजन कमी करण्यासाठी अनेकजण कठोर परिश्रम करतात. मग यासाठी डाएट तसंच सप्लिमेंट घेणं या गोष्टींचा वापर करतो. मात्र काही आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत नाही ज्या आपल्या वजनवाढीसाठी कारणीभूत असतात. आरोग्य तज्ज्ञ डॉ. अबरार मुलतानी यांच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करण्यासाठी या छोट्या गोष्टींचा विचार करणं फार महत्वाचे आहे. ज्यामुळे शरीरात एक मोठा बदल दिसून येईल.
दररोजपेक्षा लहान प्लेटमध्ये खावं. यामुळे तुम्ही पोट भरण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा खाऊ शकाल. मुख्य म्हणजे आपलं आरोग्य आणि जीवनशैली आपल्या मनावर निर्धारित केली जाते. जेव्हा एक, दोन किंवा तीन प्लेट्स खाल्ल्याचं मन आणि मेंदूपर्यंत पोहोचतं तेव्हा त्याला समाधानी वाटेल. अर्थात तुम्ही तीन प्लेट्स खाल्ले आहेत, परंतु त्या तीन प्लेट्समधील जेवणाची मात्रा तुमच्या दैनंदिन आहारापेक्षा कमी असेल.
जेवताना जेवताना हळू हळू चावून खा. जेव्हा आपण हळू हळू चावून खातो त्यावेळी तुम्ही थोडसंचं मात्र बराच वेळ खाल. हे मेंदूला सूचित करेल की तो बराच काळ खात आहे आणि पोट भरलं आहे.
खाण्याच्या वेळी आपलं लक्ष केवळ खाण्यावर असलं पाहिजे. मोबाइल किंवा टीव्हीमध्ये दिसणारी परिस्थिती किंवा त्यातून उद्भवणारी भावना आपल्यात हार्मोनल बदल आणते. यामुळे, आपण जे अन्न खात आहात ते योग्य पचत नाही आणि आपल्याला जास्त प्रमाणात खाण्याची इच्छा होऊ शकते.
आपण आपलं जेवण स्वतः बनवलं पाहिजे. यामुळे अप्रत्यक्षपणे आपलं वजन कमी होण्यास मदत होते. इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा स्वयंपाक करताना आपण या गोष्टींची अधिक काळजी घ्याल की आपलं वजन वाढवू शकतं. उदाहरणार्थ, तेल, तूप आणि वजन कमी करण्यात मदत करणाऱ्या घटकांचा काळजीपूर्वक समावेश कराल.
डॉ. अबरार मुलतानी यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी खाण्याची कोणतीही गोष्ट बघता तेव्हा तुम्हाला खायची इच्छा होते. म्हणून काहीतरी खरेदी करण्यासाठी बाजारात जा किंवा घराबाहेर जाण्यापूर्वी निरोगी आहार घ्या.