वॉशिंग्टन : अमेरिकेतील डॉक्टरांनी एका धक्कादायक प्रकरणाचा खुलासा केला आहे. यामध्ये एका महिलेच्या पोटात दुखत होतं. पोटात जास्त दुखत असल्याने ती डॉक्टरकडे गेली त्यावेळी तपासात धक्कादायक खुलासा झाला. ती महिला गरोदर असल्याचा विचार करत होती. मात्र तिच्या पोटात मोठा सिस्ट असल्याने तिला हा त्रास होत असल्याचं समोर आलंय.
डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, महिलेच्या पोटात अनेक दिवसांपासून दुखत होतं. पोटात दुखत असल्याने मासिक पाळी नसूनही तिला रक्तस्राव होत होता. रुग्णालयात डॉक्टरांनी महिलेचं अल्ट्रासाऊंड केलं असता तिच्या गर्भाशयात दोन सिस्ट असल्याचं आढळून आले. एक सिस्त सुमारे 7 सेमी तर दुसरा वाटाण्याच्या दाण्याइतका होता.
दरम्यान डॉक्टरांनी ऑपरेशन करून तिच्या पोटातून हा सिस्ट बाहेर काढला.
डॉक्टरांनी महिलेला सांगितलं की, तिच्या गर्भाशयातील दोन सिस्टमध्ये दात आणि केसांचा समावेश आहे. गेल्या 2 वर्षांपासून हे सिस्ट महिलेच्या पोटात वाढत होते. मात्र ती गर्भवती नसून तिच्या पोटात ट्यूमर होता.
महिलेने एका टिकटॉक व्हिडिओमध्ये या समस्येबद्दल सांगितलं. आपल्यासोबत हे घडेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं, असं महिलेने सांगितले.
गर्भ विकासादरम्यान गर्भाच्या ऊतीपासून वेगळे होणाऱ्या कणांमुळे सिस्ट्स होतात. सिस्टमध्ये केस आणि दात असतात.