केरळ : सध्या केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. केरळमध्ये 15 जणांचा बळी गेल्यानंतर आता बंगालमध्येही एका जवानाचा निपाह व्हायरसमुळे मृत्यू झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालेले आहे. निपाह व्हायरसवर कोणताही ठोस उपाय नसल्याने प्रतिबंधात्मक उपाय करणं केवळ हाच एक उपाय आहे. निपाह्चे व्हायरस दोन प्रकारचे असल्याने त्याबाबतचा नवा खुलासा झाला आहे. Nipah Virus चा धोका पाहता फळं खाणं टाळावे का? वाचा हा एक्सपर्ट सल्ला
नॅशनल इन्सिट्युट ऑफ व्हायरॉलॉजीने दिलेल्या नव्या माहितीनुसार, केरळमध्ये थैमान पसरवण्यामागील बांग्लादेशातील व्हायरस आहे. निपाहचे मूळ बांग्लादेशाशी निगडीत आहे. यामध्ये रूग्णाच्या शरीरातील कफाची चाचणी करण्यात आली आहे. त्यानुसार निपाह व्हायरसचे दोन वेगवेगळे प्रकार असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये एक मलेशिया (NiVM) तर दुसरे बांग्लादेशामधील(NiVB) पॅटर्नशी निगडीत आहे. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, हे दोन्ही व्हायरस जीवघेणे असून त्यामुळे मृत्यूचं प्रमाण 60-85% इतके आहे. 'निपाह' व्हायरसची दहशत पसरवाणारी करोडो वटवाघुळं 'या' गावात एकत्र फळं खातात
फ्रुट्स बॅट्स या वटवाघुळाच्या प्रजातीमध्ये निपाह व्हायरस नैसर्गिकरित्या आढळतो. या वटवाघुळांनी अर्धवट खाल्लेल्या फळांच्या संपर्कात आल्यास तो व्हायरस इतर प्राण्यांच्या किंवा मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो. परिणामी त्याचा प्रसार वाढतो. निपाह व्हायरसचा संसर्ग झाल्यास वेळीच उपचार घेणं आवश्यक आहे. अन्यथा अल्पावधीतच हा व्हायरस जीवघेणा ठरतो. त्यामुळे या बाबत पुरेशी दक्षता घेणं गरजेचे आहे. Nipah Virus अलर्ट : शत्रू नव्हे, मित्र आहे वटवाघुळ ! अफलातून त्याचे फायदे